गुरुवारी (दि. ९ फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले. तब्बल सहा महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या रवींद्र जडेजा याने घातक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. मात्र, त्याच्या या कामगिरीवर आता ऑस्ट्रेलियन मीडियाने शंका उपस्थित केली आहे. यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी जोरदार प्रत्युत्तर देत सगळ्यांची तोंडं बंद केली.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पाच महिन्यांच्या दुखापतीनंतर क्रिकेटमध्ये अभूतपूर्व पुनरागमन केले आणि बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमानांनी ऑस्ट्रेलियाला केवळ १७७ धावांत गुंडाळल्याने त्याने ११व्यांदा पाच बळी घेतले. त्याच्या या कामगिरीवर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांच्यासोबतच्या सामन्यादरम्यान मोहम्मद सिराज आणि जडेजा यांनी काढलेल्या विकेट्स आणि भारताच्या हेतूवर टीका करतानाचा ‘संशयास्पद’ व्हिडिओ हायलाइट केल्याने सोशल मीडिया खळबळ उडाली. यावर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मात्र सिराज-जडेजा घटनेमागील सत्य उघड केल्याने सर्व चर्चा बंद झाल्या.
रवी शास्त्रींनी मायकेल वॉनसहित ऑस्ट्रेलियन मीडियाची केली बोलती बंद
कांगारूंची पाच बाद १२० अशी अवस्था झाल्यानंतर ही घटना घडली. तोपर्यंत जडेजाने मार्नस लाबुशेन, मॅट रेनशॉ आणि स्टीव्ह स्मिथ यांना बाद करून तीन बळी घेतले होते. डावखुरा फिरकीपटू आपल्या उजव्या हाताने सिराजच्या तळहातातून एक पदार्थ काढून त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या तर्जनीवर घासताना दिसला. फुटेजमध्ये जडेजा बॉलवर पदार्थ लावताना दिसला नाही.
ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेट फॉक्स क्रिकेटने, तसेच, कॅप्शनसह ट्विटरवर या घटनेवर कमेंट्स केली. “ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात एक शंकास्पद क्षण दिसल्यानंतर वादविवाद सुरू झाला.” ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेनने त्याला ‘इंटरेस्टिंग’ म्हटले, तर वॉनने ट्विटवर प्रतिक्रिया दिली की, “तो त्याच्या चेंडू वळवणाऱ्या बोटावर काय ठेवत आहे? हे कधीही पाहिले नाही”.
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या सुरूवातीस, स्टार स्पोर्ट्सने फॉक्स क्रिकेटच्या ट्विटवर वॉनची प्रतिक्रिया हायलाइट केली, परंतु जडेजा त्याच्या तर्जनीवर मलम लावत असल्याचे उघड करण्यापूर्वी शास्त्रींनी स्पष्ट मत व्यक्त करत सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, “मी याबद्दल फारसे ऐकले नाही. मी दोन प्रश्न विचारले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाला याबाबतीत काही समस्या होती का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे होते. सामनाधिकारी तिथे आहेत काही झाले तर बघायला. तुम्ही कशाला मध्ये मध्ये बडबड करतात.” पुढे या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, “कर्णधार रोहित आणि त्याने सर्वकाही स्पष्ट केले, आता हे प्रकरण संपले. आपण इतर कोणावर का चर्चा करत आहोत? आणि खरे सांगायचे तर मलम आहे ते मलम, मॅच रेफरीला काही निर्णय घ्यायचा असेल किंवा कारवाई करायची असेल तर सांगितली असती. तसे, या खेळपट्टीवर, तुम्हाला कशाचीही गरज नाही, चेंडू आपोआप वळेल.”