IND vs AUS 1st Test:भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद अर्धशतक करून खेळत असलेल्या रोहितने दुसऱ्या दिवशी एका बाजूने फलंदाज बाद होत असताना, संयम दाखवत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ९वे शतक पूर्ण केले. याचबरोबर कर्णधार म्हणून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला. त्याच दरम्यान रवींद्र जडेजा पायचीत होताना वाचला. एकप्रकारे तो नाबाद होता मात्र ऑस्ट्रेलिया त्याची विकेट कशी ढापता येईल असा विचार करत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या दिवशी १ बाद ७७ धावा काढल्या होत्या. रोहितने ६९ चेंडूवर नाबाद ५६ धावा पहिल्या दिवशी केलेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याने संयम दाखवत १७७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यामध्ये १४ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. कसोटी कारकिर्दीतील ९व्या शतकासह त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे नोंद केला.
नितीन मेनन यांच्यामुळे वाचला
रवींद्र जडेजा मर्फीच्या षटकात पायचीत होता होता वाचला. घडले असे की, त्याचा ऑफस्पिन चेंडू अतिशय सुंदर होता आणि त्याला जडेजाने डिफेंड केले पण करताना बॅट-पॅड एकत्र होते. त्यामुळे कर्णधार पॅट कॅमिन्सने रिव्ह्यू घेतला त्यात बॅट-पॅड मध्ये पॅडला चेंडू पहिले लागला असे दाखवत होते. पण त्यात स्पष्ट दिसत होते की तो चेंडू बॅटला आधी लागला होता. पण मात्र पिचिंग आउटसाइड असल्याने तो अंपायर कॉल निघाला आणि नितीन मेनन यांनी दिलेला नाबादचा निर्णय अंतिम राहिला ही घटना दोनवेळा घडली, कांगारू मात्र सगळे मेनन यांच्यावर नाराज झाले.
रोहित शर्मा १२० धावा करून बाद झाला. रोहित आता भारतासाठी नेतृत्व करताना कसोटी, वनडे व टी२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनला. यापूर्वी त्याने टी२० व वनडेमध्ये कर्णधार असताना शतक साजरी केली होती. मागील वर्षी कसोटी नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्याचे हे पहिलेच शतक ठरले. भारताकडून याआधी वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. मात्र, त्यापैकी एकालाही अशी कामगिरी नोंदवता आली नव्हती.
२२९ धावांवर भारताची सहावी विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा १२० धावा करून बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याला त्रिफळाचीत केले. याआधीच स्टीव्ह स्मिथने चेंडूवर त्याचा झेल सोडला होता, पण पुढच्याच चेंडूवर कमिन्सने त्याला बाद केले आणि स्मिथची चूक ऑस्ट्रेलियाला फारशी महागात पडली नाही. आता केएस भरत रवींद्र जडेजासोबत क्रीजवर आहे.
केएस भरत आठ धावा करून बाद झाला आहे. पदार्पणाच्या सामन्यात तो काही विशेष करू शकला नाही, पण त्याची विकेट घेणार्या टॉड मर्फीने पदार्पणाचा सामना खास करून दाखवला. मर्फीचे या डावातील हे पाचवे यश होते. आता अक्षर पटेल रवींद्र जडेजासोबत क्रीझवर आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाला ३०० धावांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतील. ८४ षटकांनंतर भारताची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात २४२ अशी आहे.