IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहली आणि कांगारूंचा सलामीवीर सॅम कॉन्स्टास यांच्यात धक्काबुकी झाली. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद वाढत असल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि पंच मायकेल गफ यांनी दोघांनाही शांत केले. आता या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचे वक्तव्य समोर आले आहे.
बॉक्सिंग डे कसोटीदरम्यान सॅम कॉन्स्टाससोबतच्या मैदानावरील धकाबुकीसाठी विराट कोहलीला जबाबदार धरले पाहिजे, असे त्याचे मत आहे. या प्रकरणी रिकी पॉन्टिंगने ऑन एअर सांगितले की, विराटने या वादाला जन्म दिला आहे आणि त्याबद्दल त्याला कोणतीही शंका नाही. अशात विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय म्हणाला रिकी पॉन्टिंग?
कॉमेंट्री दरम्यान रिकी पॉन्टिंग या घटनेवर म्हणाला, ‘विराट संपूर्ण खेळपट्टीला वेढा फिरून उजवीकडे आला आणि त्याने टक्कर होण्यास प्रोत्साहन दिले. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. कारण विराटने जाणीवपूर्वक सॅमला खांद्याने धक्का दिला. पंच आणि सामनाधिकारी यावर योग्य ती कारवाई करतील अशी आशा आहे. त्यावेळी क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या जवळ नसावेत. मैदानावरील प्रत्येक क्षेत्ररक्षकाला माहित असते की फलंदाज कुठे एकत्र येतात.’
हेही वाचा – IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
u
रिकी पॉन्टिंगने केले सॅम कॉन्स्टासचे समर्थन –
रिकी पॉन्टिंगने सॅम कॉन्स्टासचे समर्थन केले. तो म्हणाला, ‘मला असे वाटते की, कॉन्स्टासने खूप उशीरा पाहिले. त्याला त्याच्या समोर कोणीतरी येत आहे, याची जाणीवही नव्हती. त्यामुळे स्क्रीनवरील व्यक्तीला (कोहली) काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.’ यानंतर भारतीय चाहते रिकी पॉन्टिंगला ट्रोल करत आहेत. कारण हरभजन १९ वर्षांचा असताना पॉन्टिंगने त्याला स्लेज केले होते. त्यामुळे चाहत्यांचे म्हणणे आहे की, पॉन्टिंगने कोहलीला नैतिकतेच्या गोष्टी शिकवू नयेत.
हेही वाचा – IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
सॅम कॉन्स्टासने झळकावले अर्धशतक –
सॅम कॉन्स्टास त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात खूप आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसला. ज्यामध्ये त्याने या मालिकेत आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला दोन षटकार ठोकले. सॅमने टी-२० क्रिकेट शैलीत फलंदाजी केली आणि धावांचा वेग उंचावत ठेवण्याचे काम केले. सॅम कॉन्स्टासने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक अवघ्या ५२ चेंडूत पूर्ण केले. तो ६५ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारा सॅम हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला.