India vs Australia 5th T20 Match: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. ऋतुराज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या टी-२० सामन्यात १९ धावा करताच ऋतुराज गायकवाड विराट कोहलीचा भारतीय विक्रम मागे टाकू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या ४ डावात शतक आणि अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक २१३ धावा केल्या आहेत. कोणत्याही टी-२० द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारतीय खेळाडू विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीच्या नावावर २३१ धावा आहेत तर के.एल. राहुल २२४ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राहुलने २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. राहुलला मागे टाकण्यासाठी गायकवाडला १२ धावांची गरज आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया शेवटचा टी-२० एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी-२० आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यापूर्वी येथे सात आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले आहेत. भारताने येथे पाच टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन पराभव पत्करावा लागला आहे. येथे फलंदाजांसाठी आव्हान असणार आहे.
भारतीय टी-२० संघ
रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, दीपक चाहर, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा, रवी बिश्नोई.
ऑस्ट्रेलिया टी-२० संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वाराहुसी, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅविस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.