ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने शतक ठोकले. पहिला सामना भारताने गमावला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे मालिकेतील अंतिम सामना हा निर्णायक ठरणार आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यातदेखील भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने शतक झळकावले होते, पण तो सामना भारताला जिंकता आला नाही. या मालिकेदरम्यान भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा टेनिसच्या मैदानात हजेरी लावताना दिसला.

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये ‘ऑस्ट्रेलिया ओपन’ टेनिस स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे भारताच्या काही खेळाडूंनी प्रत्यक्ष टेनिस पाहण्याचा आनंद लुटला. हिटमॅन रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी बुधवारी ऑस्ट्रेलिया ओपनच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली. रोहितने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याचा फोटो मुंबई इंडियन्सने रिट्विट केला असून ‘जसा रोहितला आवडतो, तसा टेनिस कोर्टवर चेंडूचा बाउन्स अधिक असतो’, असा संदेश लिहिला आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात कांगारुंनी ५० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावांपर्यंत मजल मारली होती. पण भारत ५० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात केवळ २५४ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि ऑस्ट्रेलियाने ३४ धावांनी बाजी मारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा ऑस्ट्रेलियन संघाचा एक हजारावा विजय ठरला होता.

Story img Loader