विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याला वगळल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. याच मुद्द्यावर रोहितला क्रिकेटपटू म्हणून घडवणारे त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक लाइव्हमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली.

“रोहितला संघातून वगळणं हे अनपेक्षितच होतं. मला ही गोष्ट समजली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. गेल्या काही वर्षातला रोहितचा फॉर्म मस्त आहे. त्याने केवळ टी२० आणि वन डे नव्हे, तर कसोटी क्रिकेटमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही बाब काहीशी धक्कादायकच होती. पण निवड समिती आणि BCCI यांनी विचार करूनच निर्णय घेतला असेल. कारण रोहितची दुखापत कितपत गंभीर आहे याबाबत मला कल्पना नाही. कदाचित त्यानेच दुखापतीबाबत BCCIला कळवलं असेल. जर दुखापत गंभीर असेल तर सध्या रोहितला संघातून वगळणं बरोबरच आहे. कारण पूर्णपणे तंदुरूस्त न होता जर एखादा खेळाडू खेळला, तर याचा भविष्यकाळात मोठा फटका बसू शकतो”, अशी प्रतिक्रिया दिनेश लाड यांनी दिली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सूर्यकुमारची निवड न झाल्याबद्दल…

टीम इंडियामध्ये अनेक IPL स्टार्सना संधी मिळाली. पण मुंबईच्या संघात खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला स्थान मिळालं नाही. याबद्दलही त्यांनी मत मांडलं. “सूर्यकुमारची स्थानिक क्रिकेट आणि IPLमधील कामगिरी उत्तम आहे. मी संघ निवडीची घोषणा होण्याआधी अनेकांशी चर्चा केली होती. त्यावेळी सूर्यकुमार संघात स्थान मिळवणार याची आम्हाला खात्री होती. सूर्यकुमारला टीम इंडियामध्ये संधी द्यायला हवी होती. त्याला संघातून वगळणं हे संघाचं दुर्दैव आहे”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Story img Loader