भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्यात भारताने २०८ धावांचा डोंगर उभारूनही ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून आपल्या नावावर विजय नोंदवला. भारताच्या बाजूने हार्दिक पंड्याने ७१ धावांची नाबाद खेळी केली. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून कॅमेरून ग्रीनने ६१ धावा करून ऑस्ट्रेलियासाठी विजय सोपा करून दिला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अयशस्वी ठरले. याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा थेट गळाच पकडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : जेतेपदासाठी पश्चिम विभागासमोर दक्षिणेचे तगडे आव्हान

रोहितने दिनेश कार्तिकचा गळा का पकडला?

भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यास अयशस्वी ठरत होते. मात्र अक्षर पटेलने कॅमेरून ग्रीनला ११ व्या षटकात बाद केल्यामुळे भारताच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यानंतर रोहितने उमेश यादवच्या हातात चेंडू दिला. उमेश यादवने टाकलेल्या तिसऱ्याच चेंडूवर टीम इंडियाने स्टेवन स्मीथ झेलबाद झाल्याची अपील केली. हा झेल दिनेश कार्तिकने टिपला होता. पंचाने बाद न दिल्यामुळे भारताने रिव्ह्यू घेतला. यात स्मीथ बाद झाल्याचे समोर आले. त्यानंतर याच षटाकातील शेवटच्या चेंडूवर अशीच स्थिती पाहायला मिळाली. रिव्ह्यू घेतल्यामुळे ग्लेन मॅक्सवेल फक्त एक धाव करून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाचे हे दोन्ही गडी बाद होताना दिनेश कार्तिकने पूर्ण विश्वासाने अपील केली नव्हती. याच कारणामुळे रोहित शर्माने गंमत म्हणून दिनेश कार्तिकचा थेट गळाच पकडला. दिनेश कार्तिकनेही रोहित शर्माच्या या कृतीला मेजशीर पद्धीनेच घेतले.

हेही वाचा >>> चेंडूला लाळ लावण्यास प्रतिबंधाचा नियम कायम! ; ‘आयसीसी’कडून प्रस्तावित बदलांवर शिक्कामोर्तब; १ ऑक्टोबरपासून लागू

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने खराब सुरुवातीनंतरही जबरदस्त फलंदाजी करत २०८ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हिड या दोघांच्या झुंजार खेळी केली. परिणामी ऑस्ट्रेलियाने या सामन्यात चार गडी राखून विजय मिळवला. कॅमेरून ग्रीनने ३० चेंडूत ६१ धावांची खेळी केली त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus rohit sharma grab dinesh karthik in india vs australia t20 match prd