Rohit Sharma has decided to rest himself for IND vs AUS Sydney Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना आज सिडनीत खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने या सामन्यात स्वत:हून विश्रांती घेतली आहे. याबाबत कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहने माहिती दिली. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

३७ वर्षीय रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने खराब फॉर्ममुळे स्वत: विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यापासून, त्याच्या कर्णधारपदासाठी आणि अतिरिक्त बाऊन्स आणि सीम हालचालींचा सामना करू शकत नसल्याबद्दल त्याच्यावर टीका होत आहे. आता भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपत येत असताना, कसोटी क्रिकेटपटू म्हणून रोहितची कारकीर्द निराशाजनक शेवटाकडे जात आहे.

Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
Image of PM Modi And R Ashwin
PM Modi’s Letter To Ashwin : “तुझ्या कॅरम बॉलने सर्वांनाच बोल्ड केले”, अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र
Australia make significant changes to squad for two Tests sports news
मॅकस्वीनीला डच्चू, कोन्सटासला संधी; अखेरच्या दोन कसोटींसाठी ऑस्ट्रेलिया संघात महत्त्वपूर्ण बदल

जसप्रीत बुमराह काय म्हणाला?

जसप्रीत नाणेफेकीच्या वेळेला म्हणाला, “रोहितने या सामन्यात विश्रांती घेणे पसंत केले आहे. यावरून संघातील एकजूट दिसून येते आणि संघ सकारात्मक आणि विजयाबद्दल विचार करत असल्याचे दिसून येते. आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. कारण मागील काही सामन्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रोहितच्या जागी शुबमन गिल आणि जखमी आकाश दीपच्या जागी प्रसिद कृष्णाला संधी मिळाली आहे.”

हेही वाचा – India 2025 Cricket Calendar: इंग्लंड दौरा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकप…, भारताच्या क्रिकेट सामन्यांचं २०२५ मध्ये कसं असणार वेळापत्रक?

रोहितप्रमाणे काही ऐतिहासिक उदाहरणं –

कसोटी मालिकेदरम्यान कर्णधाराने स्वत: विश्रांती घेण्याची उदाहरणे खूपच दुर्मिळ आहे. परंतु अभूतपूर्व नाहीत. काही उल्लेखनीय उदाहरणांचा समावेश आहे. कारण याआधी मिसबाह-उल-हकने कर्णधार असताना (पाकिस्तान, २०१४): ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून स्वतः विश्राती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने कर्णधारपद स्वीकारले होते.

तसेच २०१४ मध्ये श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंडीमलन उपांत्य आणि अंतिम सामन्यासह टी-२० विश्वचषकाच्या शेवटच्या तीन सामन्यांमधून बाहेर राहिला होता, त्यावेळ लसिथ मलिंगाने कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली होती. इंग्लडच्या माईक डेनेसनेही १९७४ मध्ये जॉन एडरिचकडे कर्णधारपद सोपवून अॅशेसच्या चौथ्या कसोटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरच्या सामन्यांमध्ये डेनेसने संघाचे नेतृत्व केले.

हेही वाचा – Khel Ratna Award 2024 : मनू भाकेर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न, १७ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधा), प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज.

Story img Loader