Rohit Sharma insulted on Cheteshwar Pujara: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचाभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी हा त्याचा १००वा कसोटी सामना आहे. शुक्रवारी अरुण जेटली स्टेडियमवर पाय टाकताच पुजाराने स्वतःचे १०० कसोटी सामने पूर्ण केले. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना पुजारासोबत या सामन्यात चुकीचे वर्तन झाले, असे माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर याने म्हटले आहे.
रोहितने चुकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी केले उभे
चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला होता. शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) सुरू झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि प्रथम गोलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात चेतेश्वर पुजारा स्वतःचा १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण गौतम गंभीर याच्या मते रोहितने त्याला चुकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभे केले. गंभीरच्या मते पुजारासारख्या वरिष्ठ खेळाडूला शॉर्ट लेगवर म्हणजेच खेळपट्टीच्या अगदी जवळ उभा करणे योग्य नव्हते.
क्रिकेटमध्ये शक्यतो नवख्या खेळाडूंना शॉर्टवर क्षेत्ररक्षणासाठी उभे केले जाते. पण रोहित शर्मा याने पुजाराला याठिकाणी उभा केल्यामुळे गंभीरने नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याविषयी म्हणाला की, “जो युवा आणि संघात नवीन असतो, त्याला याठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभे केले जाते. पुजाराच्या दोन्ही गुडघ्यांची सर्जरी झाली आहे आणि तो दीर्घकाळ खेळपट्टीवर फलंदाजीही करत असतो. अशात कर्णधाराने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.”
गंभीर पुढे म्हणाला, “जो खेळाडू वरच्या फळीत फलंदाजीला उतरणार आहे, त्याला याठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभे करणे योग्य नाही, हे कर्णधाराने समजून घेतले पाहिजे. याठिकाणी खूप जास्त खाली वाकावे लागते. आणि त्यामुळे थकवा येतो. अशात शॉर्टवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला फलंदाजी करताना अडचण येते. त्याला अडचणीचा सामना करावा लागतो.”
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतम गंभीरने पुजाराचे कौतुक केले आणि म्हणाला, “मी त्याचे पदार्पण पाहिले आणि आता त्याला त्याची १००वी कसोटी खेळताना पाहत आहे. मला वाटते की तो खूप कमी दर्जाचा आहे. तो फार कमी बोलतो. आम्ही रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि इतरांबद्दल बोलतो, मला विश्वास आहे की चेतेश्वर पुजारा हे या कसोटी फलंदाजी फळीतील सर्वात मोठे नाव आहे.”
ऑस्ट्रेलियात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात पुजाराच्या योगदानाची गौतम गंभीरने दखल घेतली. तो म्हणाला, “जर तुम्ही ऑस्ट्रेलियातील त्याच्या शेवटच्या मालिकेबद्दल बोललो तर आम्ही ऋषभ पंत आणि इतर खेळाडूंबद्दल बोललो. चेतेश्वर पुजारा माझ्यासाठी मालिकावीर ठरला कारण तो ब्रिस्बेनमध्ये ज्या प्रकारे खेळला, त्याने अंगावर जे चेंडू खाल्ले ते कोणीच करू शकत नाही.”
गौतम गंभीर म्हणाला की, “तुम्ही पुजाराला कोणतीही भूमिका द्या, तो साकारण्यास तयार आहे. तो म्हणाला, ‘पुजारा सौराष्ट्रातून आला आहे. तुमच्यासाठी कसोटी खेळणे अवघड आहे आणि तो त्याची १००वी कसोटी खेळत आहे. प्रदीर्घ तास, चढ-उतार, डावाची सुरुवात, बाद होणे, त्याने संघासाठी काय केले नाही? तो संघाचा माणूस आहे. तथापि, आपण त्यांच्याबद्दल जितके जास्त बोलता तितके कमी आहे.”
गौतम गंभीरने असेही म्हटले की, दीर्घ फॉर्मेटमध्ये वाढणाऱ्या खेळाडूंसाठी सर्वात मोठा आदर्श हा एक प्रतिबद्ध क्रिकेटपटू आहे.” गंभीर म्हणाला, “जेव्हा कसोटी सामने नसतात तेव्हा किती खेळाडू असतात, जे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतात. पुढच्या पिढीसाठी तो आदर्श आहे. जर तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये रस असेल तर तुम्ही चेतेश्वर पुजाराला फॉलो करा.”