भारतीय संघ २१ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताकडून रोहित शर्माचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या फलंदाजीची ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला धडकी भरली आहे. रोहितचा झंझावात थांबवणं अशक्य आहे, असे मत मॅक्सवेलने व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियात एका मुलाखतीत मॅक्सवेल बोलत होता. तो म्हणाला की रोहित शर्मा जेव्हा फलंदाजी करतो, टेंबवह त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव दिसत नाही. तो अगदी सहज फलंदाजी करताना दिसतो. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम रोहितच्या नावे आहे. त्याने २६४ धावा फटकावल्या आहेत. त्याला कोणीही थांबवू शकत नाही.

रोहित चेंडू फटकावण्याच्या वेळेमुळे अधिक चांगला फलंदाज म्हणून उठून दिसतो. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज दोनही प्रकारच्या गोलंदाजांना तो उत्तम प्रकारे खेळून काढतो आणि तो स्वतःच्या मनानुसार फटकेबाजी करून शकतो, असेही तो म्हणाला.

Story img Loader