IND vs AUS Rohit Sharma name missing from official list of Indian squad for Sydney Test : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळत नाहीये. त्याच्या जागी जसप्रीत बुमराहच्या हाती कर्णधारपद आहे. बुमराहने टॉसच्या वेळी सांगितले की, रोहितने स्वतः विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला आहे. बरं, रोहित बाहेर बसणार असे संकेत सामन्यापूर्वीच मिळाले होते. पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला विचारण्यात आले होते की, रोहित खेळणार का? यावर त्यांनी खेळपट्टी पाहून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. यानंतर भारतीय संघातील अधिकृत खेळाडूंची यादी व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाणेफेकीच्या वेळी, प्रत्येक संघ आपापले प्लेइंग इलेव्हन जाहीर करतो. त्यानंतर ४ राखीव खेळाडूंची नावं दिली जातात. गरज पडल्यास हे खेळाडू मैदानात येऊ शकतात. या चार खेळाडूंमध्येही रोहित शर्माचे नाव नव्हते. देवदत्त पडिक्कलला १२वा, ध्रुव जुरेलला १३वा, अभिमन्यू ईश्वरनला १४वा, सर्फराझ खानला १५वा तर हर्षित राणाला १६वा खेळाडू बनवण्यात आले आहे. गौतम गंभीरच्या सहीनिशी असलेलल्या यादीचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहितच्या नावाचा समावेश नाही.

तीन खेळाडूंची नावं नाहीत यादीत-

भारतीय संघात सध्या एकूण १९ खेळाडू आहेत. यापैकी केवळ तीन खेळाडूंची नावे यादीतून गायब आहेत. त्यात एक जखमी आकाश दीपचा समावेश आहे. रोहित शर्माशिवाय रविचंद्रन अश्विनच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या तनुष कोटियनचा संघाच्या यादीत समावेश नाही. आता यामागचे कारण संघ व्यवस्थापनच सांगू शकेल. रोहित स्टेडियममध्ये असून सामन्यापूर्वी मैदानावरही दिसला होता. कॅमेरा अनेक वेळा ड्रेसिंग रूममध्ये गेला असता रोहित दिसत होता.

हेही वाचा – IND vs AUS : विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम! कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं

रोहित कसोटीतून होणार निवृत्त?

रोहित शर्मा ३७ वर्षांचा आहे. भारतीय संघ सिडनी कसोटीनंतर मे महिन्यापर्यंत या फॉरमॅटमध्ये कोणताही सामना खेळणार नाही. तोपर्यंत रोहित शर्मा ३८ पार करेल. जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आहे आणि त्यानंतर भारताला इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज खेळायची आहे. अशा परिस्थितीत रोहित पुन्हा कसोटीत भारतासाठी दिसेल अशी आशा कमी आहे.