भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत तिसरी कसोटी जिंकून २-१ अशी आघाडी घेतली. गेल्या ७१ वर्षात भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण अखेरची कसोटी जिंकून भारताला हा कलंक पुसण्याची सुवर्णसंधी आहे. अशा वेळी भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि तिसऱ्या कसोटीत नाबाद अर्धशतक ठोकणारा रोहित शर्मा हा चौथ्या कसोटीला मुकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित आणि त्याची पत्नी रितिका यांच्या घरात ३० डिसेंबरला चिमुकलीचे आगमन झाले. त्यामुळे रोहित कालच (३० डिसेंबर) मुंबईला रवाना झाला. तो ८ जानेवारीला पुन्हा ऑस्ट्रेलियात येऊन एकदिवसीय सामन्यात खेळणार आहे. पण ३ ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध नाही. BCCI ने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तसेच तो बाबा झाल्याने त्याचे अभिनंदन देखील केले आहे.

 

दरम्यान, रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. रोहित शर्माने आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतर रितिका आणि रोहित आई-बाबा झाले आहेत.