IND vs AUS 4th Test Day 5 Updates in Marathi: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. ज्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने रोहित शर्माची विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने दोन्ही वेळेस रोहित शर्माला बाद केलं आहे. कर्णधार वि कर्णधार या द्वंद्वामध्ये कमिन्सने बाजी मारली आहे. कमिन्सने रोहितला ९ धावांवर बाद करत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखाद्या संघाच्या कर्णधाराने विरोधी संघाच्या कर्णधाराची सातत्याने विकेट घेतल्याचे कसोटी क्रिकेटमध्ये फार कमी वेळेस घडलं आहे. पण बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पॅट कमिन्सने रोहित शर्माला बाद करत, कर्णधार म्हणून रोहित शर्माला त्याने सहाव्यांदा बाद केलं आहे. हा कसोटी क्रिकेटमधील एक नवीन विश्वविक्रम आहे कारण याआधी रिची बेनोडने टेड डेक्सटरला ५ वेळा आपल्या गोलंदाजीवर बाद केले होते, ज्यात दोघेही आपापल्या संघाचे कर्णधार होते.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास, दिग्गजांना मागे टाकत ठरला जगातील नंबर वन गोलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विरोधी संघाच्या कर्णधाराला बाद करणारा कर्णधार

रोहित शर्मा – पॅट कमिन्सविरुद्ध ६ वेळा बाद

टेड डेक्सटर – रिची बेनोड विरुद्ध ५ वेळा बाद

सुनील गावस्कर – इम्रान खानविरुद्ध ५ वेळा बाद

गुलाबराय रामचंद – रिची बेनोड विरुद्ध ४ वेळा बाद

क्लाइव्ह लॉईड – कपिल देव विरुद्ध ४ वेळा बाद

पीटर मे – रिची बेनोड विरुद्ध ४ वेळा बाद

हेही वाचा – IND vs AUS : रोहित-विराटच्या विकेटनंतर अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीच्या रिॲक्शनने वेधले लक्ष, फोटो होतायेत व्हायरल

पॅट कमिन्स हा घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा कर्णधार

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणारा कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नावावर आतापर्यंत ७९ विकेट्स आहेत. या यादीत पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार इम्रान खानचे नाव पहिल्या स्थानावर आहे, ज्याने कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ८८ विकेट घेतल्या होत्या. याशिवाय या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रिची बेनोडचे नाव आहे ज्यांनी ७६ विकेट घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus rohit sharma wicket pat cummins create world record captain dismissing captain of opposite team most times in test bdg