IND vs AUS, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून चांगली सुरुवात केली आहे. २०० धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली पण के.एल. राहुल आणि विराट कोहलीच्या भागीदारीने संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्वीट करून ऑस्ट्रेलियाच्या एका निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत काय चूक केली, ते सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ३०-४० षटकांच्या तुलनेत नंतर फलंदाजी करणे कठीण होईल, असे मानले जात होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या, भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतल्याने पराभवाचा धोका होता. राहुलने विराट कोहलीच्या साथीने पहिला डाव सांभाळत तंदुरुस्त संघाला हळूहळू विजयाच्या दिशेने नेले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले होते. स्टीव्ह स्मिथ (४६) आणि डेव्हिड वॉर्नर (४१) यांनी संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय मार्नस लाबुशेनने २७ धावांचे योगदान दिले तर मिचेल स्टार्कने २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने २ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर विराट कोहली (८५) आणि केएल राहुल (९७*) यांनी हळूहळू डाव पुढे नेत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, विराट विजयापूर्वी काही धावा काढून बाद झाला. शेवटी भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला.

हेही वाचा: World Cup 2023: पाकिस्तान सामन्याआधी श्रीलंकेला ICCने दिला झटका, ‘मॅच फीच्या १० टक्के ठोठावला दंड

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ निर्णयाने हैराण – सचिन तेंडुलकर

भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने ट्वीट करून संघाचे अभिनंदन केले आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या चुकांवरही प्रकाश टाकला. त्याने लिहिले की, “ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचे मला आश्चर्य वाटले. भारतीय गोलंदाजांनी प्रशंसनीय कामगिरी करत त्यांना १९९ धावांत रोखले. ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली पण मला वाटते की त्यांना या खेळपट्टीवर डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचा अंदाज घेता आला नाही, तिथे त्यांचा निर्णय चुकला. विराट आणि राहुल यांच्यातील भागीदारीमुळे आमच्यासाठी सामना रंगला. त्यांनी आपला वेळ अतिशय हुशारीने घेतला आणि काही उत्कृष्ट शॉट्स मारण्यात यश मिळवले. खेळाच्या उत्तरार्धात चेंडू नक्कीच चांगला बॅटवर येत होता. चांगल्या सुरुवातीसाठी टीम इंडियाचे अभिनंदन!”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus sachin tendulkars tweet after indias victory over australia expressed surprise about this avw