Sanjay Manjrekar and Irfan Pathan arguing over Yashasvi Jaiswal runout : मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम इंडिया पुन्हा एकदा बॅकफूटवर दिसत आहे. दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालने अप्रतिम फलंदाजी केली. जैस्वाल अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याच्या शतकाच्या अगदी जवळ होता. दरम्यान त्याने विराटसह तिसऱ्या विकेट्साठी शतकी भागीदारी केली होती. मात्र, यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात दोघात ताळमेळचा अभाव दिसून आला, ज्यामुळे यशस्वी जैस्वाल रनआऊट झाला. जैस्वाल रनआऊट झाल्यानंतर दोन भारतीय दिग्गजांमध्ये जुंपली.
बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा यशस्वी जैस्वाल रनआऊट झाला, तेव्हा यावरुव टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान पठाण आणि संजय मांजरेकर एकमेकांशी वाद घालताना दिसले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.
Heated Argument Between Sanjay Manjrekar And Irfan Pathan, Sanjay Manjrekar Was Defaming Virat Kohli While Irfan Pathan Was Defending Virat Kohli ( On Yashasvi Jaiswal Run Out)#INDvsAUS #ViratKohli #YashasviJaiswal#AUSvINDIA pic.twitter.com/8YmOcA8JyL
— Harsh 17 (@harsh03443) December 27, 2024
दोन्ही माजी दिग्गज कोहलीवरुन एकमेकांशी भिडले –
Lafda between Irfan and Sanjay Manjrekar ?pic.twitter.com/F2huaodmBn
— Pushkar (@Musafirr_Hu_yar) December 27, 2024
वास्तविक संजय मांजरेकर मते, यशस्वी जैस्वालच्या रनआऊटमध्ये कुठेतरी विराट कोहलीची चूक होती. ते म्हणाले, “विराट कोहली चेंडू पाहत होता, नॉन स्ट्रायकरने नेहमी स्ट्रायकवर असणाऱ्या फलंदाजाकडे लक्ष दिले पाहिजे. ही स्पष्टपणे विराट कोहलीची चूक होती.” मात्र, यात विराटची चूक नसल्याचे इरफान पठाणचे मत होते. मॅचनंतर लाईव्ह शो दरम्यान या दोन दिग्गजांमध्ये हा वाद पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
यशस्वी धावबाद झाल्यानंतर कांगारूंनी विराट कोहलीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जैस्वाल आऊट झाल्यानंतर सेट झालेल्या विराटची एकाग्रता भंग झाली आणि तो बोलंडच्या षटकात झेलबाद झाला. त्याचा झेल यष्टिरक्षक कॅरीने टिपला. त्याला ८६ चेंडूत ३६ धावा करता आल्या. जैस्वाल-विराटनंतर भारताला १५९ धावांवर पाचवा धक्का बसला. सहा धावांच्या आत भारताने तीन विकेट्स गमावल्या आहेत. आकाश दीपला बोलंडने लायनच्या हाती झेलबाद केले. तो नाईट वॉचमन म्हणून आला होता. आकाशला खाते उघडता आले नाही. सध्या रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत नाबाद आहेत. तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल ८२ धावा करून बाद झाला तर विराट कोहली ३६ धावा करून बाद झाला. रोहित तीन धावा करून आणि राहुल २४ धावा करून बाद झाला.