भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सलामीवीर उस्मान ख्वाजा व अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर पहिला डावात ४८० धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर बिनबाद ३६ अशी मजल मारली आहे.

सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी स्टेडियमवर पोहोचल्याने हा सामना आणखीनच खास बनला, जिथे त्यांचा फोटो देऊन गौरव करण्यात आला. मात्र, या दोघांपेक्षा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसोबत केलेल्या लाजिरवाण्या कृत्यामुळे या सामन्याची चर्चा अधिकच रंगली आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चाहते शमीला व्हिडिओमध्ये काहीतरी बोलण्याची विनंती करत आहेत. त्यानंतर शमीची प्रतिक्रिया चर्चेत आहे. ज्याचा तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ पाहून अंदाज लावू शकता.

Hardik Pandya Throws Bat Curses Himself After His Wicket in IND vs ENG 3rd T20I Video Viral
IND vs ENG: हार्दिक पंड्याने आऊट झाल्यावर मैदानातच काढला राग, बॅट फेकली अन्… VIDEO व्हायरल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Sanju Samson Scored 22 Runs in an Over Against Gus Atkinson Hit 5 Boundaries Watch Video
IND vs ENG: ४,४,६,४,४ संजू सॅमसनने इंग्लंडच्या हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाची केली धुलाई; एका षटकात कुटल्या २२ धावा
IND vs ENG 1st T20I Abhishek Sharma half-century helps India beat England by 7 wickets in Eden Gardens
IND vs ENG : अभिषेक शर्माने मोडला युवराज सिंगचा खास विक्रम, कोलकात्यात साकारली स्फोटक खेळी

मोहम्मद शमीने चाहत्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले

खरं तर, चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचे सर्व खेळाडू चहापानानंतर पुन्हा मैदानात परतण्याच्या तयारीत होते. त्यामुळे स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या काही चाहत्यांनी सुर्याला जोरात हाक मारण्यास सुरुवात केली. यानंतर सुर्याने त्याला हात दाखवून आणि नंतर हात जोडून अभिवादन स्वीकारण्यास सुरुवात केली.

मग काय, सुर्याने हात जोडताच लगेचच मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी भगवंताच्या नावाने जय श्री राम जय श्री राम ‘जय श्री राम’चा जयघोष सुरू केला. यानंतर चाहत्यांनी मोहम्मद शमीचे नाव घेऊन त्याला ‘जय श्री राम, जय श्री राम’ म्हणण्याचे आवाहन केल्यावर हद्द झाली. हे दृश्य क्रीडाप्रेमी खेळाडूसाठी खूपच अस्वस्थ करणारे होते. यानंतर चाहत्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत मोहम्मद शमी मैदानाकडे निघाला.

हेही वाचा: IND vs AUS: “भारतावर जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित…”, ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी क्रिकेटपटूंच्या वक्तव्यावर गावसकर संतापले

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारताने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता ३६ धावा केल्या. भारतीय संघाला आज १० षटकांची फलंदाजी करायची होती. सध्या कर्णधार रोहित शर्मा ३३ चेंडूत नाबाद १७ धावा आणि शुबमन गिल २७ चेंडूत १८ धावा करून नाबाद आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा ४४४ धावांनी मागे आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांवर संपला. उस्मान ख्वाजाने १८० धावा, कॅमेरून ग्रीनने ११४ धावा आणि टॉड मर्फीने ४१ धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सहा विकेट घेतल्या. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ रोहित-शुबमनच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करू इच्छितो.

Story img Loader