IND vs AUS Basit Ali criticizes Indian Team : मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारतीय संघ सामना अनिर्णित करेल, असे वाटत होते. मात्र पुढच्या दोन तासांत संपूर्ण संघ कोलमडून पडला. ऋषभ पंतने खराब शॉट खेळला आणि त्यानंतर विकेट पडत राहिल्या. यावर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने टीका केली आहे. बासित अलीने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, फलंदाजी प्रशिक्षक आणि ऋषभ पंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
बासित अली काय म्हणाला?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीच्या मते, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, फलंदाजी प्रशिक्षक आणि ऋषभ यांनी डोक्याचा वापर करायला हवा होता. बासित अली म्हणाला, “शाबास गौतम गंभीर सर. तुम्ही न्यूझीलंडविरुद्ध लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन खेळवत होता. आज तुम्ही नितीश रेड्डीला सहाव्या क्रमांकावर पाठवायचं होतं. जरी तो लवकर आऊट झाला असता, तरी तुम्ही काहीतरी केलं आहे, हे कळलं असतं. तुमचा फलंदाजी प्रशिक्षक कोण आहे, माहित नाही. ज्याला कसं टिकायचं आणि कोणत्या गोलंदाजाला कसे खेळायचं, हे माहित नाही.”
बासित अलीची भारतीय संघावर टीका –
बासित अली पुढे म्हणाला, “भारत अत्यंत खराब क्रिकेट खेळला. ऑस्ट्रेलियाची योजना चांगली होती. त्यांनी हार मानली नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवला. ९० च्या दशकातील फलंदाज आणि २०१० नंतर आलेल्या फलंदाजांमध्ये हाच फरक आहे. ८० आणि ९० च्या दशकातील फलंदाजांना विरोधी संघाची योजना चटकन समजत असायची की हा खेळाडू विकेट घेण्यासाठी आला आहे.
हेही वाचा – IND vs AUS : ‘रोहित-विराटला बाहेर करायला हिंमत लागते…’, माजी भारतीय खेळाडूचे बीसीसीआयला आव्हान
u
माजी पाकिस्तानी खेळाडू पुढे म्हणाला, “ज्या प्रकारे ट्रॅव्हिस हेड विकेट घेण्यासाठी आला होता. यापूर्वी कोणताही खेळाडू असा बाद झाला नव्हता, जरी कोणी असा शॉट खेळला, तरी त्याचा चेंडू जमिनीवर पडला असता. पण ऋषभ पंतने मूर्खपणा केला आणि षटकार मारायला गेला अन् काय झालं? कोणाचं नुकसान झालं? देशाचं आणि संघाचं. देवानं डोकं दिलयं तर त्याचा वापर करायला हवा होता.”
© IE Online Media Services (P) Ltd