बंगळुरुच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना २८६ धावांपर्यंत मजल मारली. स्टिव्ह स्मिथचं शतक आणि लाबुशेनने त्याला अर्धशतक करत दिलेली उत्तम साथ या जोरावर कांगारुंनी सन्मानजनक धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, त्यावेळी एक बदल पहायला मिळाला.
सलामीवीर शिखर धवनच्या ऐवजी लोकेश राहुल पहिल्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. शिखर धवनच्या खांद्याला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाल्यामुळे त्याला एक्स-रे काढण्यासाठी बाहेर नेण्यात आलेलं आहे. यामुळे धवन ऐवजी राहुलला सलामीच्या जागेवर संधी देण्यात आली. धवनच्या दुखापतीबद्दल नेमकी माहिती मिळत नसल्यामुळे त्याच्या भविष्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्माने अवघ्या ४ धावा काढत वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
अवश्य वाचा – Ind vs Aus : अवघ्या ४ धावांत ‘हिटमॅन’चा विक्रम, गांगुली-सचिनला टाकलं मागे