IND vs AUS, Shubman Gill Injury: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून खेळवला जात आहे. तर त्याचवेळी माजी खेळाडू सुनील गावसकर आणि मॅथ्यू हेडन या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल याच्या संदर्भात कॉमेंट्री पॅनलमध्ये एकमेकांशी भिडले आहेत.

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये कॉमेंट्री करत आहेत. तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गावसकर यांनी टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलबद्दल असे काही बोलले, ज्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. रनआउट टाळण्यासाठी शुबमन गिलने डायव्हिंग केले आणि यादरम्यान तो जखमी झाला, त्यानंतर त्याने फिजिओला मैदानावर बोलावले, परंतु गावस्कर यांना ते अजिबात आवडले नाही. षटक संपायला दोन चेंडू बाकी आहेत, त्यामुळे गिलने दोन चेंडूंची वाट पाहिली असावी, असे गावसकरांचे मत होते. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनलाही गावसकरांचे हे विधान फारसे आवडले नाही आणि कॉमेंट्रीदरम्यान त्याने गावसकर यांना यासाठी अडवलेही.

Sourav Ganguly agrees with Gautam Gambhir opinion
Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Ricky Ponting Hits Back at Gautam Gambhir over Virat Kohli Form Remarks Said He is quite a prickly character
Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: ख्वाजाचे शानदार अर्धशतक! इंदोर कसोटीत पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

सुनील गावसकर यांनी गिलच्या दुखापतीवर वादग्रस्त विधान केले

वास्तविक, ही संपूर्ण घटना सामन्याच्या ७व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर घडली. त्यावेळी भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल क्रीजवर उपस्थित होते. या चेंडूवर गिलला धाव घ्यायची होती, पण पुजाराने धाव घेण्यास नकार दिला, त्यानंतर गिलला रनआउट टाळण्यासाठी डायव्ह करावा लागला आणि या डाईव्हदरम्यान त्याच्या पोटात दुखापत झाली. दुखापतीनंतर सामना थांबवावा लागला आणि फिजिओला मैदानावर बोलावावे लागले.

या घटनेवर भाष्य करताना भारताचे माजी महान खेळाडू सुनील गावसकर यांनी फिजिओसाठी षटक संपण्याची वाट पाहिली असती असे वादग्रस्त विधान केले. समोर एखादा वेगवान गोलंदाज असेल तर त्याने चार चेंडू टाकले आहेत आणि ते खूप गरम आहे. अशा स्थितीत तुम्ही त्याला विश्रांतीचा वेळ देत आहात. होय, तुम्हाला दुखापत झाली असेल पण तुम्ही दोन चेंडू पूर्ण होण्याची वाट पाहू शकता. अशा छोट्या गोष्टींमुळे खूप मोठा फरक पडतो.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: शास्त्री गुरुजींचे दोन शब्द अन् मॅथ्यू हेडनची बोलती बंद, खेळपट्टीवरच्या लांबलचक भाषणाला दिले जबरदस्त उत्तर

लिटिल मास्टरचे बोलणे मॅथ्यू हेडनला आवडले नाही

मात्र त्याचवेळी सुनील गावसकर यांच्यासोबत कॉमेंट्री करत असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन यांना हे आवडले नाही.त्याने गावस्कर यांना मध्येच अडवत म्हटले, “सनी, तू खूप कठोर माणूस आहेस. ही गोष्ट माझ्या मनाला नांगीसारखी टोचली आहे.” पण, हेडनच्या मध्यस्थीनंतरही सुनील गावसकर आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले.