Steven Smith Most Century World Record in BGT History IND vs AUS MCG Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथने मोठा पराक्रम केला आहे. स्टीव्हन स्मिथने टीम इंडियाविरुद्ध पहिल्या दिवशी दमदार सुरुवात केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शतक झळकावून इतिहास रचला. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात विराट आणि सचिनला मागे टाकत सर्वाधिक शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

स्टीव्हन स्मिथने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात १४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. या सामन्यात शतक झळकावताच तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १० शतके पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. स्मिथने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा नऊ शतकांचा विक्रम मोडला असून तो आता १० शतकांसह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतकं झळकवणारे फलंदाज –

  • स्टीव्हन स्मिथ – (४१) १०
  • सचिन तेंडुलकर – (६५) ९
  • विराट कोहली – (४७) ९
  • रिकी पाँटिंग – (५१) ८
  • मायकेल क्लार्क – (४०) ७

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या कारकिर्दीतील हे ३४वे शतक असून, स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३४ शतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत स्मिथ (११) आता भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने जो रूटला मागे टाकले आहे. रुटने आपल्या कसोटी कारकिर्दीत भारताविरुद्ध १० शतके झळकावली होती. रिकी पाँटिंग भारताविरुद्ध ८ शतके झळकावण्यात यशस्वी ठरला होता. याशिवाय हॅरी सोबर्सने ८ शतके आणि व्ही. रिचर्ड्सने भारताविरुद्ध ८ शतके झळकावण्याचा विक्रम केला होता.

हेही वाचा – IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

u

स्टीव्हन स्मिथचे विक्रम :

  • ३४ वे कसोटी शतक
  • भारताविरुद्धचे ११वे कसोटी शतक
  • या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दुसरे शतक
  • भारताविरुद्ध १६ वे आंतरराष्ट्रीय शतक
  • भारताविरुद्ध सर्वाधिक ११ कसोटी शतकं
  • बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी इतिहासात सर्वाधिक १० शतकं

Story img Loader