Sunil Gavaskar gave advice to Indian Selection Committee : मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारता ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८४ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. यानंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंवर सातत्याने टीका होत आहे. विराट-रोहितसारखे वरिष्ठ खेळाडू ऑस्ट्रेलियात आव्हान पेलण्यात आणि आपल्या बॅटने धावा करण्यात अपयशी ठरले, ही वस्तुस्थिती लपवता येणार नाही. भारतीय कर्णधार रोहितसाठी निवृत्तीचा मुद्दा आधीच चर्चेचा विषय असताना, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट आपली एकमेव चूक सुधारण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावरही टीका होत आहे. अशात भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी निवडकर्त्यांना कोहली आणि रोहितसारख्या भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
विराट कोहलीबद्दल सुनील गावस्कर काय म्हणाले?
विशेषतः कोहलीबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले की, “बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर वारंवार बाद होण्यामागे त्याचा फूटवर्क जबाबदार होता. इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, “कोहलीचा पाय चेंडूच्या दिशेने जात नाही, पाय सरळ खेळपट्टीवर राहतो. जर पाय चेंडूच्या दिशेने जास्त गेला, तर तुम्हाला चेंडू मधून मारण्याची संधी अधिक असते. कारण पाय हलत नसल्यामुळे, तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही आणि आऊट होता.”
गावस्करांचा भारतीय निवडसमिताल महत्त्वाचा सल्ला –
u
आता वरिष्ठ खेळाडूंसह पुढे जाण्याच्या मुद्द्यावर, बीसीसीआय, निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि इतर निवडकर्त्यांना याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे गावसकर यांचे मत आहे. कारण पहिल्या फळीत वरिष्ठ खेळाडूंकडून अपेक्षित योगदान लाभलं नाही . सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “हे सर्व निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. जे योगदान अपेक्षित होतं तसं झालं नाही. पहिल्या फळीला योगदान द्यावे लागेल. जर पहिली फळी योगदान देत नसेल, तर खालच्या फळीला दोष का द्यायचा?”
u
सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “वरिष्ठ खेळाडूंनी जे योगदान दिले पाहिजे होते, ते त्यांनी खरोखरच दिले नाही. त्यांना फक्त आज फलंदाजी करायची होती आणि आणि सिडनीमध्ये लढण्यासाठी टिकून राहायचे होते. खरे तर, ऑस्ट्रेलियात भारताची अशी स्थिती असण्यामागे वरिष्ठ खेळाडूंचे अपयश हे सर्वात मोठे कारण आहे. कारण फक्त पहिल्या फळीतील वरिष्ठ खेळाडूंनी योगदान दिले नाही. त्यामुळेच भारताची अवस्था झाली.”