IND vs AUS Surinder Khanna statement on Virat Kohli and Rohit Sharma : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत १८४ धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर विराट-रोहितला माजी क्रिकेटपटूंकडून टार्गेट केले जात असून त्यांना संघात बाहेर करण्याची मागणी जोर धरत आहे. अशात भारताता माजी यष्टिरक्षक-फलंदाज सुरिंदर खन्ना यांनी फॉर्मात नसलेले विराट-रोहितला बेंचवर बसवण्याची मागणी केली आहे. दोन्ही स्टार फलंदाज मागील काही सामन्यांपासून धावा करण्यासाठी संघर्ष करत असलेले दिसत आहेत.

रोहित शर्माची कामगिरी –

भारतीय कर्णधार रोहित शर्मा पर्थमधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटीला खेळू शकला नाही, परंतु संघात सामील झाल्यानंतर या दौऱ्यावर धावा काढण्यासाठी तो संघर्ष करत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावात त्याने केवळ ३१ धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर भारतीय कर्णधाराने मधल्या फळीपासून टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी क्रम बदलला तरी त्याचा फायदा झाला नाही.

IND vs SA T20I Series Full Schedule With Date and Time with IST And Squads India South Africa
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Sunil Gavaskar' Unfiltered Message To Ajit Agarkar Amid Virat Kohli and Rohit Sharna Exit Talks
Sunil Gavaskar : विराट-रोहितला बाहेर करण्याच्या चर्चेदरम्यान सुनील गावस्करांनी निवडसमितीला दिला महत्त्वाचा सल्ला
Navjot Singh Sidhu on Travis Head celebration
IND vs AUS, 4th Test: ट्रॅव्हिस हेडच्या कथित अश्लील सेलिब्रेशनवर सिद्धू संतापले; म्हणाले, “त्याला अशी शिक्षा द्या की…”
Alka Kubal
“त्या रोज पॅक अप झालं की…”, अलका कुबल यांनी सांगितली स्मिता पाटील यांची आठवण; म्हणाल्या…
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
sairat fame marathi actor tanaji galgund girlfriend
‘सैराट’ फेम तानाजी गाळगुंडेच्या गर्लफ्रेंडने दिली प्रेमाची कबुली? अभिनेत्याबरोबरचा ‘तो’ फोटो पोस्ट करून लिहिलं….
Happy New Year budget collection
९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ बॉलीवूड चित्रपट?

विराट कोहलीची कामगिरी –

दुसरीकडे विराट कोहलीला पर्थ कसोटीतील शतकानंतर मोठी खेळी साकारण्यात सातत्याने अपयश आले आहे. या दौऱ्यातील शेवटच्या तीन कसोटीत त्याने ७, ११, ३, ३६ आणि ५ धावा केल्या आहेत. ऑफ-स्टंपबाहेरचा संघर्ष माजी कर्णधारासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात चांगले तंत्र दाखवूनही कोहलीला चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या धावसंख्यमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने तीच चूक केली.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal : ‘यशस्वी जैस्वाल स्पष्टपणे नॉट आऊट होता…’, तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर BCCIच्या उपाध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया

सुरिंदर खन्ना म्हणाले काय म्हणाले?

सुरिंदर खन्ना म्हणाले, “रोहित शर्मा आणि विराट कोहली पूर्ण फॉर्ममध्ये नाहीत. जेव्हा तुमचे मुख्य फलंदाज फॉर्ममध्ये नसतात आणि तुमच्याकडे पुरेशा धावा नसतात तेव्हा कसोटी सामना जिंकणे कठीण असते. ऑस्ट्रेलियाने परिस्थितीनुसार चांगले क्रिकेट खेळले आणि चांगले संयोजन केले. आमचे युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, (नितीश कुमार) रेड्डीने पहिल्याच दौऱ्यात शतक झळकावले आणि (यशस्वी) जैस्वाल सातत्याने धावा करत आहेत.”

हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहित कर्णधार नसता तर संघातच नसता…’, हिटमॅनच्या खराब फॉर्मवर इरफान पठाणचं मोठं वक्तव्य

माजी क्रिकेटपटू म्हणाला संघ व्यवस्थापनाने इतर खेळाडूंशी रस्ता मोकळा करण्यासाठी या खेळाडूंशी बोलण्याचे धाडस दाखवण्याची गरज आहे. माजी क्रिकेटपटू म्हणाला, “रोहित परत आल्यापासून तो मधल्या फळीत आणि टॉप ऑर्डरमध्ये खेळत आहे, पण धावा काढू शकत नाही. ही एक समस्या आहे ज्याकडे गौतम गंभीर, निवडकर्ते आणि स्वतः रोहित शर्मा लक्ष देत नाहीत. त्यामुळे कर्णधार आणि विराटला सांगायची हिंमत पाहिजे की तुम्ही एक-एक करुन बाहेर बसा आणि इतर खेळाडूंना संधी द्या. तुमच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंनी धावा केल्या पाहिजेत अशी तुमची अपेक्षा आहे, पण ते फॉर्ममध्ये नाहीत. त्यामुळे चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.”

Story img Loader