Suryakumar Yadav Press Conference IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील निराशाजनक पराभवाच्या दुःखातून अजूनही भारतीय चाहते सावरलेले नाहीत. अशातच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मोहिमेची घोषणा झाली आहे. २३ नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये होणार्‍या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. नव्याने नियुक्त कर्णधार सूर्यकुमारने पहिल्या सामन्याच्या आधी पत्रकार परिषद घेतली होती. भारतीय क्रिकेटपटूंना बराच वेळ चालणाऱ्या पत्रकार परिषदांची सवय आहे पण सूर्यकुमार यादव याच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत एक विचित्र प्रकार घडल्याचे समजतेय.

विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20I सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेसाठी फक्त दोन पत्रकार उपस्थित होते. खरंतर अधिकृत आकडेवारी नसली तरी साधारण निरीक्षणानुसार भारतीय पुरुष क्रिकेट स्पर्धांच्या अलीकडील कोणत्याही पत्रकार परिषदेला असलेल्या उपस्थितीचा तुलनेत हा आकडा खूपच कमी होता. साहजिकच याचं आश्चर्य वाटल्याने सूर्यकुमारने सुद्धा “फक्त दोनच जण”? असा प्रश्न परिषदेला पोहोचताच केला होता. अवघ्या चार मिनिटातच ही पत्रकार परिषद संपताना सूर्याच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी त्यामागे आश्चर्य होतं हे लगेच लक्षात येतं.

विश्वचषकाच्या शेवटच्या टप्प्यातील निराशाजनक पराभवाविषयी सांगताना सूर्या म्हणाला की, “ही वेळ आमच्यासाठीही कठीण आहे, आणि त्यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागू शकतो. असं होऊ शकत नाही की, तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जे घडलं ते सर्व विसरून जाल. ही एक मोठी स्पर्धा होती. आम्हाला ती जिंकायला आवडलं असतं, परंतु जसा प्रत्येक सकाळी नव्याने सूर्य उगवतो, अंधारलेल्या बोगद्याच्या शेवटी प्रकाश असतो. तोच विचार घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल. हा एक नवीन संघ (टी-20 संघ) आहे, आम्ही आव्हानाची वाट पाहत आहोत.”

हे ही वाचा<< मोहम्मद शमीचं फसवणुकीच्या आरोपांवर सणसणीत उत्तर; पाकिस्तानचं नाव घेत म्हणाला, “मी प्रार्थना करतो, १० गोलंदाज..”

सूर्या म्हणाला की, “चाहत्यांचा आणि कुटुंबीयांचा पाठिंबा त्याला आणि बाकीच्या खेळाडूंना निराशेतून पुढे जाण्यास मदत करतोय. साहजिकच, थोडी निराशा झाली पण जेव्हा तुम्ही प्रवासाकडे मागे वळून पाहता तेव्हा ही एक उत्तम मोहीम होती. संपूर्ण भारताला आणि आमच्या कुटुंबियांना अभिमान वाटला. ज्या प्रकारे प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडली, आम्ही संपूर्ण स्पर्धेत उत्तम क्रिकेट खेळलो. आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो.”

Story img Loader