अंतिम टी२० सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ३ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्यात बाजी मारली. विराटने ४१ चेंडूत नाबाद ६१ धावा करत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघापुढे कोहलीला रोखण्याचे आव्हान आहे. टी२० मालिकेत त्यांना हे शक्य झाले नाही. त्यामुळे आता कसोटी मालिकेत मात्र कोहलीचा झंझावात थांबवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने मास्टरप्लॅन तयार केला आहे. कोहलीला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा संघ निलंबित खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांची मदत घेणार आहेत.

विराट कोहली

 

चेंडू कुरतडल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवता आले नाही. पण संघात स्थान माळले नसले तरीही हे दोघे अत्यंत अनुभवी असून त्यासारख्या या अनुभवाचा वापर ते ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना करून देणार आहेत.

कृणाल पांड्या हा अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. तो पहिल्या सामन्यात टीकेचा धनी ठरला होता. पण कृणालने उत्कृष्ट कामगिरी करत शेवटच्या सामन्यात भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मात्र निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे कसोटी मालिकेआधी स्मिथ आणि वॉर्नर हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची शिकवणी घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वॉर्नरने नेट्समध्ये सराव सत्रात फलंदाजी केली. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड त्याला गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने cricket.com.au या ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे. तसेच एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या सराव सत्रानंतर वॉर्नरने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन काही टिप्स दिल्या.

Story img Loader