India vs Australia, T20 series: विश्वचषक जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध टी-२० मालिकेत खेळणार आहे. २३ नोव्हेंबरपासून उभय संघांमधील पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या सलामीच्या लढतीपूर्वी कांगारू संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरने चमकदार कामगिरी केली होती. त्याने संघासाठी ११ सामन्यात सर्वाधिक ५३५ धावा केल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, ३७ वर्षीय वॉर्नर या मालिकेत न खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्यांच्याशिवाय विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि मिचेल मार्शसह मिचेल स्टार्क हेही भारताविरुद्ध खेळू शकणार नाहीत. भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर कांगारू संघाला १४ डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

अ‍ॅरॉन हार्डी संघात सामील झाला

अष्टपैलू अ‍ॅरॉन हार्डीचा टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. केन रिचर्डसन टी-२० मालिकेत स्पेन्सर जॉन्सनची जागा घेणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर अवघ्या चार दिवसांनी जरी ही मालिका सुरू झाली असली तरी, ही मालिका पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समध्ये होणाऱ्या टी-२० आवृत्तीच्या तयारीचा एक भाग आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी-२० आवृत्ती सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणखी सहा टी-२० मालिका खेळणार आहे. ३५ वर्षीय ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड भारताविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व करेल.

हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतून युजवेंद्र चहलचा पत्ता कट, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत.

ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू वेड (कर्णधार), ट्रॅविस हेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, अ‍ॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, नॅथन एलिस, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झाम्पा, तन्वीर संघा.

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

हेही वाचा: India vs Qatar: फुटबॉलमध्ये टीम इंडिया करणार कतारशी दोन हात, फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारत प्रवेश करेल का?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-२०: २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम

दुसरा टी-२०: २६ नोव्हेंबर, तिरुवनंतपुरम

तिसरा टी-२०: २८ नोव्हेंबर, गुवाहाटी

चौथा टी-२०: १ डिसेंबर, रायपूर

पाचवा टी-२०: ३ डिसेंबर, बंगळुरू

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus t20i shock to australia before the t20 series against india star opener batsman out of the team avw