26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी झालेल्या मुरली विजय आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना तिसऱ्या कसोटीतून डच्चू देण्यात आलेला असून मयांक अग्रवालला अंतिम संघात स्थान देण्यात आलेलं आहे. हनुमा विहारीनेही संघातलं आपलं स्थान कायम राखलेलं असून तो मयांकसोबत फलंदाजीला सलामीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. याचसोबत रोहित शर्मानेही संघात पुनरागमन केलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने फिरकीपटूला संघात स्थान दिलं नव्हतं. त्यातचं रविचंद्रन आश्विन दुखापतीमधून सावरलेला नसल्यामुळे उमेश यादवला विश्रांती देत भारताने अष्टपैलू रविंद्र जाडेजाला संघात स्थान दिलं आहे. हार्दिक पांड्याला मात्र संघात स्थान मिळवता आलेलं नाहीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारताचा अंतिम 11 जणांचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह</p>