ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीमध्ये भारताने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला २३५ धावांवर ऑलआऊट केल्यानंतर भारताने १५ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर कोलमडलेली भारतीय फळी, दुसऱ्या डावात संयमीपणे खेळली. सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. विजय माघारी परतल्यानंतर विराट आणि लोकेश राहुलने झटपट धावा जमवल्या. यानंतर राहुल ४४ धावांवर बाद झाल्यानंतर पुजारा आणि कोहली जोडीने भारतीय संघाची कमान सांभाळली. दिवसाअखेरीस भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडे सध्या १६६ धावांची आघाडी जमा आहे. भारतीय संघाने केलेल्या या संयमी खेळीवर प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच खूश आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – IND vs AUS : ती विराटची सेलिब्रेशन करण्याची स्टाईल, जस्टीन लँगरने चुकीचा अर्थ घेतला ! – व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

“आजचा दिवस आमच्या संघासाठी खऱ्या अर्थाने चांगला गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव झटपट गुंडाळण्यात आम्हाला यश आलं, मोक्याच्या क्षणी आमच्या गोलंदाजांनी चांगला संयम दाखवला. फलंदाजीमध्येही आमच्या खेळाडूंनी खूप संयम दाखवला, दोन विकेट गेल्यानंतर पुजारा आणि कोहली यांनी भारतीय डावाला चांगल्या पद्धतीने स्थैर्य दिलं. अजुन आमचं काम संपलेलं नसलं तरीही आजचा दिवस हा आमचा होता, यात काहीच शंका नाही.” स्थानिक ऑस्ट्रेलियान प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शास्त्री यांनी आपल्या संघाचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : ऋषभ पंतची महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी