India vs Australia 5th T20 Match: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ रविवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर, पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे, पण अंतिम सामना जिंकून त्यांना ४-१ असे फरक वाढवायचा आहे. भारतीय संघाने ही मालिका जर ४-१ने जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विक्रम होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची या फॉरमॅटमधील मालिका सर्वात मोठ्या फरकाने टीम इंडिया जिंकेल. दोन्ही संघांमध्ये प्रथमच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस आणि चाहरला छाप सोडायला आवडेल

दक्षिण आफ्रिका दौरा लक्षात घेता या सामन्यात श्रेयस अय्यर आणि दीपक चाहर यांना संधी मिळू शकते. भारताला १० डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये अय्यर आणि चाहर महत्त्वाची भूमिका बजावतील. अय्यरने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, परंतु शुक्रवारी त्याने रायपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२३ मधील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात त्याने ७ चेंडूंचा सामना करत ८ धावा केल्या, ज्यात एकाही चौकाराचा समावेश नव्हता.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी श्रेयस आणि दीपकला ताकद दाखवायची आहे

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी अय्यर चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी एकदिवसीय विश्वचषकात या मैदानावर त्याने नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले होते. अय्यरप्रमाणेच चाहरनेही दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर पुनरागमन केले आहे.

हेही वाचा: Rahul Dravid: “आम्ही त्याला प्रशिक्षक होण्यासाठी…”, सौरव गांगुलीने द्रविडचा कार्यकाळ वाढवण्याबाबत केले मोठे विधान

दीपकने शेवटच्या टी-२०मध्ये दोन विकेट्स घेतल्या

चाहरचा रायपूरमध्ये खेळला गेलेला सामना हा गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतरचा भारतासाठी टी-२० प्रकारातील पहिला सामना होता. ३१ वर्षीय वेगवान गोलंदाजाने टीम डेव्हिड आणि मॅथ्यू शॉर्टची विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात खूप मदत केली, परंतु चार षटकांच्या कोटामध्ये त्याने ४४ धावा दिल्या. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी त्याला अनुकूल नसेल, पण त्याच्या अष्टपैलू गोलंदाजीमुळे चाहर यश मिळवू शकतो.

सुंदरचा संघात प्रवेश होऊ शकतो

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी संघ व्यवस्थापन या सामन्यात ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरलाही संधी देऊ शकते. वॉशिंग्टनही काही काळ दुखापतींमुळे हैराण आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात स्थान न मिळालेला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल किंवा रवी बिश्नोई यांना विश्रांती देऊन त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. आजच्या सामन्यासाठी संघ व्यवस्थापन कर्णधार सूर्यकुमार यादवला विश्रांती देईल आणि श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल. सूर्या सतत भरपूर क्रिकेट खेळत आहे. अशा परिस्थितीत तिलक वर्मा यांना विश्रांती देऊनही संधी मिळू शकते.

हेही वाचा: Mitchell Johnson: ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरवर भडकला; म्हणाला, “गुन्हेगाराला निरोपाची मालिका…”

युवा टीम इंडियाने प्रभावित केले

कर्णधार सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांनी भारताकडून फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात किशनच्या जागी खेळलेल्या जितेश शर्मानेही आपल्या फलंदाजीने प्रभावित केले. त्याचबरोबर या संपूर्ण मालिकेत रिंकू सिंगने आपल्या मॅच फिनिशिंग कौशल्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. गोलंदाजीत रवी बिश्नोईने आतापर्यंत सात विकेट्स घेत चांगली कामगिरी केली आहे.

हेडकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने अद्याप अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. त्यांना विजयासह मालिका संपवून मायदेशी परतायचे आहे. विश्वचषक अंतिम फेरीचा नायक ट्रॅविस हेडने संघाला आक्रमक सुरुवात नक्कीच करून दिली आहे, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. संघाला एकहाती सामना जिंकून देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची नक्कीच उणीव भासली. मात्र, टीम डेव्हिड खराब फॉर्मशी झुंजत असून त्याच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११

भारत: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया: जोश फिलिप, ट्रॅविस हेड, बेन मॅकडर्मॉट, अ‍ॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/ विकेट्स), बेन ड्वार्शुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा/नाथन एलिस/केन रिचर्डसन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus team india ready to create history sundar tilak may get chance know possible playing 11 avw
Show comments