भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकीची जादू गुरुवारी (९ फेब्रुवारी) सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाली. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. सध्या या सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांत ऑलआऊट केला होता. त्याचवेळी भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या आहेत. पहिल्या डावात २२३ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

जडेजाने पहिल्या डावात पाच आणि अश्विनने तीन बळी घेतले. यानंतर रोहितने २१२ चेंडूत १२० धावांची खेळी केली. जडेजा ७० आणि अक्षर पटेल ८४ धावा करून टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेले मात्र त्यांचे शतक हुकले. दोघांनी आठव्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी केली आहे. अश्विननेही फलंदाजीचे योगदान दिले. त्याने २४ धावा केल्या. रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या अप्रतिम कामगिरीला सचिन तेंडुलकरने एसएस राजामौलीच्या आरआरआरशी जोडले.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा: IND vs AUS 1st Test:  बापू तमे छा गयो! अक्षर पटेलची तुफानी खेळी; तब्बल २२३ धावांची आघाडी घेत टीम इंडिया भक्कम स्थितीत

सचिनने काय केले ट्विट?

मास्टर-ब्लास्टर सचिनने ट्विटरवर रोहित, अश्विन आणि जडेजाचे कौतुक केले आहे. टीम इंडियाशी आरआरआरचे कनेक्शन जोडून त्याने लिहिले, “RRR… रोहित, रवींद्र आणि रविचंद्रन या त्रिकुटाने या कसोटीत टीम इंडियाला पुढे केले आहे.” रोहितने शतक झळकावून संघाचे नेतृत्व केले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला

रोहित शर्माने १७ महिन्यांनंतर कसोटीत शतक केले आहे. शेवटच्या वेळी त्याने सप्टेंबर २०२१ मध्ये ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध १२७ धावांची इनिंग खेळली होती. रोहितनेही ऑस्ट्रेलियाचे शतक झळकावून इतिहास रचला. कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी२०) शतक झळकावणारा रोहित हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा खेळाडू आहे. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांनी कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. रोहितने कर्णधार म्हणून एकदिवसीय मध्ये तीन आणि टी२०मध्ये दोन शतके झळकावली आहेत.

Story img Loader