भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी आशिया चषकादरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकला नाही. जडेजा दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या संघात आहे, पण त्याला आधी फिटनेस सिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी तो रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२४ ते २७ जानेवारी दरम्यान सौराष्ट्र संघ रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप बी मध्ये तामिळनाडू विरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. ईएसपीएनक्रिकइंफो नुसार या सामन्यासाठी जडेजाला सौराष्ट्र संघात ठेवण्यात येणार आहे. आशिया कपमध्ये दुखापत झाल्यानंतर जडेजाच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन सुरू आहे.

फिटनेस चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

एनसीएने फिटनेस प्रमाणित केल्यानंतरच जडेजाच्या निवडीचा विचार केला जाईल, असे निवडकर्त्यांनी स्पष्ट केले. जडेजाने या आठवड्याच्या सुरुवातीला फलंदाजी आणि गोलंदाजी पुन्हा सुरू केल्याची माहिती आहे परंतु स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयार आणि उपलब्ध मानण्यासाठी त्याला फिटनेस चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: कर्णधाराच्या विश्वासास ठरला पात्र! शुबमनचे श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज शतक, इशानसाठी धोक्याची घंटा

पंतच्या गैरहजेरीत जडेजाला हजेरी लावली पाहिजे

जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी खालच्या क्रमाने शानदार फलंदाजी करतो. तो संघाचा समतोल राखतो. विशेषत: ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत खालच्या फळीत त्याच्यासारखा अनुभवी खेळाडू हवा. तो रविचंद्रन अश्विनसोबत धोकादायक फिरकी जोडीही तयार करतो.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत, तिसरी कसोटी १ मार्चपासून धर्मशाला आणि चौथी कसोटी ९ मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवली जाईल. त्यानंतर कांगारू संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना १७ मार्चला मुंबईत, दुसरा विशाखापट्टणममध्ये १९ मार्चला आणि तिसरा एकदिवसीय सामना २२ मार्चला चेन्नईत खेळवला जाईल.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: ६,१,४,४,४,४ लाहिरू कुमाराच्या एका षटकात सलामीवीरांनी चौकार-षटकारांची केली आतिषबाजी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक) रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि सूर्यकुमार यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus test jadeja challenged to prove fitness bcci sets condition the ranji trophy will be played before the test series avw
Show comments