भारतीय क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) घरच्या मैदानावर ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारताच्या बदलत्या खेळपट्ट्या लक्षात घेऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात ४ फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे. अशा स्थितीत पाहुण्या संघाला यजमानांवर त्यांच्याच शस्त्रांनी हल्ला करायचा आहे, हे स्पष्ट झाले आहे.
ऑस्ट्रेलियाने २२ वर्षीय फिरकीपटू टॉड मर्फीचा समावेश केला असून त्याची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. पण सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दोघांचा सहभाग फिटनेसवर अवलंबून असेल.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मर्फीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
नॅथन लियॉनच्या नेतृत्वाखालील फिरकी विभागात अॅश्टन आगर आणि मिचेल स्वेप्सन हे त्याच्यासोबत सामील होतील. अॅडम झाम्पाला या संघात स्थान मिळवता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणतात की मर्फीची निवड हे शेफिल्ड शिल्डमध्ये त्याच्या दमदार पदार्पण आणि ऑस्ट्रेलिया अ आणि प्राइम मिनिस्टर इलेव्हनसाठी केलेल्या प्रयत्नांचे बक्षीस आहे.
जॉर्ज बेली म्हणाले, “टॉड मर्फीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि अलीकडे ऑस्ट्रेलिया अ संघासोबत. त्या कामगिरीसह, टॉड एक मजबूत फिरकी पर्याय म्हणून पुढे आला आहे. संघातील त्याच्या समावेशामुळे त्याला नॅथन लायन आणि सहाय्यक प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांच्यासोबत भारतात वेळ घालवण्याची संधी मिळेल, जे त्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.
हेही वाचा – IND vs SL 1st ODI: …म्हणून टीम इंडियाने मुद्दाम शनाकाला शतक झळकावू दिले: खुद्द रोहित शर्माने खुलासा केला
ऑस्ट्रेलियाच्या घरच्या दौऱ्यानंतर अनकॉट लान्स मॉरिसने आपले स्थान कायम राखले आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो पदार्पण करू शकतो, कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होणार नाही.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा २०२३ –
९-१३ फेब्रुवारी: पहिली कसोटी
१७-२१ फेब्रुवारी: दुसरी कसोटी
१-५ मार्च: तिसरी कसोटी
९-१३ मार्च: चौथी कसोटी
हेही वाचा – IND vs SL 1st ODI: टीम इंडियाने रचला नवा विश्वविक्रम; ऑस्ट्रेलियाला मागे टाकत बनला जगातील पहिलाच संघ
एकदिवसीय मालिका –
१७ मार्च: पहिली वनडे
१९ मार्च: दुसरी वनडे
२२ मार्च: तिसरी वनडे
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर</p>