IND vs AUS Perth Test Harshit Rana and Nitish Kumar Reddy to make debut : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला २२ नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारपासून पर्थ येथे सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. मात्र, या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना पर्थ कसोटीत खेळणार नाहीत. त्यामुळे भारतीय संघ युवा खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत दिसत आहे. पर्थ कसोटीत हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी भारतासाठी कसोटी पदार्पण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोण आहे नितीश कुमार रेड्डी?

नितीशचा आंध्र प्रदेशचा खेळाडू आहे . तो बॉलिंग ऑलराऊंडर आहे. शार्दूल ठाकूरने गेल्या सीरिजला जे काम केलं ते नितीशने करावं अशी अपेक्षा आहे. नितीश सनरायझर्ससाठी चांगलं खेळला. त्यांनी त्याला रिटेनही केला आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादकडून तुफानी फलंदाजी करताना अनेक विक्रम मोडीत काढले होते. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला आयपीएल २०२४ साठी सुद्धा रिटेन केले आहे.

PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
IND vs AUS 3rd Test Match Drawn in Gabba
India vs Australia 3rd Test Drawn: गाबा कसोटीत पावसाचाच खेळ, कसोटी अनिर्णित; मालिका बरोबरीतच
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड
Travis Head is the first batter in Test Cricket to bag a King Pair & century at a venue in the same calendar year
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेडचा गाबा कसोटीत मोठा विक्रम, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Jasprit Bumrah Frustrate Over Ball Not Swinging in IND vs AUS Gabba Test Stump Mic Video Goes Viral
IND vs AUS: ‘स्विंग होत नाहीय…’, बुमराह गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी वैतागला; रोहित शर्माचा नाणेफेकीचा निर्णय चुकला? पाहा VIDEO

मागील दौऱ्यात शार्दूल ठाकूरने जे काम केलं होतं, ते नितीशने करावं अशी टीम इंडियाची अपेक्षा आहे. नितीशला आपली क्षमता सिद्ध करण्याची ही मोठी संधी असेल.नितीशने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत २० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने २०.२२ च्या सरासरीने ६२७ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५४ विकेट्सही घेतल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS : भारताचे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत वर्चस्व! पण ऑस्ट्रेलियात कसा आहे हेड टू हेड कसोटी रेकॉर्ड? जाणून घ्या

कोण आहे हर्षित राणा?

दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा, ज्याला आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी केकेआरने रिटेन केले आहे. तो आता पर्थमध्ये कसोटी पदार्पण करू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पर्थमधील मॅच सिम्युलेशनमध्ये हर्षित खूप प्रभावी होता, विशेषत: त्याच्या बाउन्सरने सर्वांना प्रभावित केले आहे. हर्षित राणा न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत पदार्पण करेल, अशी बरीच चर्चा होती पण तसं झालं नाही. हर्षितसाठी केकेआरचे दोन हंगाम चांगले गेले आहे. जिथे आताचा टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर त्यावेळी केकेआरचा मेन्टॉर होता, ज्याचा त्याला फायदा झाला आहे. हर्षितने आतापर्यंत एकूण १० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४३ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने एक रणजी सामना खेळला आहे, जो तो आसामविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने ५ विकेट्स घेत अर्धशतकही झळकावले होते.

हेही वाचा – Kuldeep Yadav : ‘इतकं सुंदर लिहिण्यासाठी पैसे मिळाले की काही वैयक्तिक वैमनस्य…’, शिवीगाळ करणाऱ्याला कुलदीप यादवचे चोख प्रत्युत्तर

देवदत्त पडिक्कलला शुबमनच्या जागी संधी मिळणार?

हर्षितने आतापर्यंत एकूण १० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४३ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने एक रणजी सामना खेळला आहे, जो तो आसामविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने ५ विकेट्स घेत अर्धशतकही झळकावले होते. देवदत्त पडिक्कलने इंडिया ए साठी चांगली कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याला आता शुबमन गिलच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलिया थांबवले आहे. तो फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. अभिमन्यू ईश्वरन संघात आहे, ऋतुराजची चर्चा होती पण देवदत्त पडिक्कल मागून येऊन चर्चेत आहे. देवदत्त पडिक्कलला गेल्या दोन आठवड्यात चांगली कामगिरी केल्याचा फायदा झाला आहे.

Story img Loader