IND vs AUS head to head record Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. मात्र, या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे भारतीय संघासमोर मोठे आव्हान असेल कारण कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना पर्थ कसोटीत खेळणार नाहीत. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचा हेड टू हेड रेकॉर्डही तणावात टाकणार आहे. तो कसा आहे जाणून घेऊया.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताचे वर्चस्व –

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेला १९९६ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे नाव देण्यात आले. तेव्हापासून ही स्पर्धा एक समान आणि रोमांचक ठरली आहे. भारताने ५६ बीजीटी सामन्यांमध्ये २४ विजयांसह हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये थोडीशी आघाडी घेतली आहे. कारण ऑस्ट्रेलियाने २० सामने जिंकले आहेत आणि १२ सामने अनिर्णीत राहिले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियात झालेल्या सामन्यात २७ सामन्यात भारताने ६ आणि ऑस्ट्रेलियाने १४ सामने जिंकले आहेत. तसेच सात ७ सामने अनिर्णीक राहिले आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीतील हेड टू हेड रेकॉर्ड (१९४७-२०२३) –

  • एकूण कसोटी सामने: १०७
  • ऑस्ट्रेलियाचे विजय: ४५
  • भारताचे विजय : ३२
  • ड्रॉ- २९
  • टाय-१

हेही वाचा – Virat Kohli Viral Post: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीच्या पोस्टने उडवली खळबळ; पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

  • सचिन तेंडुलकर – ६५ डावात ३२६२ धावा
  • रिकी पॉन्टिंग – ५१ डावात २५५५ धावा
  • व्हीव्हीएस लक्ष्मण – ५४ डावात २४३४ धावा
  • राहुल द्रविड – ६० डावात २१४३ धावा
  • मायकेल क्लार्क – ४० डावात २०४९ धावा
  • चेतेश्वर पुजारा – ४३ डावात २०३३ धावा

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलदाज –

  • नॅथन लायन – ४७ डावात ११६ विकेट्स
  • रविचंद्रन अश्विन – ४२ डावात ११४ विकेट्स
  • अनिल कुंबळे – ३८ डावात १११ विकेट्स
  • हरभजन सिंग – ३५ डावात ९५ विकेट्स
  • रवींद्र जडेजा – ३० डावात ८५ विकेट्स

हेही वाचा – IND vs AUS: रिंकू सिंगचे ५ चेंडूत ५ षटकार खाल्लेल्या गोलंदाजाला मिळाली ऑस्ट्रेलियावारीची संधी

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे खेळाडू –

  • सचिन तेंडुलकर – ६५ डावात ९ शतके
  • विराट कोहली – ४२ डावात ८ शतके
  • स्टीव्ह स्मिथ – ३५ डावात ८ शतके
  • रिकी पॉन्टिंग– ५१ डावात ८ शतके
  • मायकेल क्लार्क – ४० डावात ७ शतके