Mohammed Siraj Travis Head Fight: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद सर्वांच लक्ष वेधून घेणारा ठरला. या वादावर ट्रॅव्हिस हेड आणि मोहम्मद सिराजने आपआपली वक्तव्य मांडली. इतकंच नव्हे तर माजी क्रिकेटपटूंनी देखील यावर आपलं मत मांडलं. पण आता भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर एक चेंडू खेळून झाल्यानंतर सिराज हेडजवळ जाऊन बोलताना दिसला. या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे हेडने सामन्यानंतर सांगितलं आहे.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हेड आणि सिराजमध्ये काय बोलणं झालं?

रविवारी भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. सिराज जेव्हा स्ट्राईकवर असताना हेड क्षेत्ररक्षण करत होता, यादरम्यान एक चेंडू खेळून झाल्यानंतर हेडजवळ गेला आणि दोघेही काहीतरी बोलताना दिसले. हेडने मॅचनंतर एबीसी स्पोर्ट्सला सांगितले की, सिराज म्हणाला की, हे सर्व गैरसमजातून घडले.

हेही वाचा – IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

हेड म्हणाला, ‘त्या घडलेल्या प्रकाराबद्दल सर्वठिक आहे. त्याने मला येऊन सांगितले की, गैरसमजातून हा सर्व प्रकार घडला. मला वाटते की आपण हे सोडून आता पुढे जाऊया. हा आठवडा आमच्यासाठी खूप खास आहे. आम्हाला तो खराब करायचा नाही. ‘त्याने मला विचारले की मी त्याला शिवीगाळ केली होती का? मी म्हणालो सुरूवातीला मी शिवी दिली नाही पण दुस-यांदा नक्कीच शिवी घातली. मी सुद्धा हसून गोष्ट सोडून देऊ शकलो असतो. गैरसमज झाल्याचेही त्याने मला सांगितले. मला याबद्दल अडचण नाही. आम्ही पुढे गेलो आहोत. हे सर्व असं आहे.’

हेही वाचा – IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

हेही वाचा – WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ

मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेडच्या या संभाषणाचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिराज दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे चाहते त्याची हुर्याे उडवत होते. मोहम्मद सिराज फलंदाजी करत असताना हेडने सिराजचा एक झेल सोडला आणि तो चेंडू चौकारासाठी गेला. यानंतर बोलँडने टाकलेला चेंडू मोहम्मद सिराजच्या बॅटची कड घेत हवेत उडाला. अखेरीस हेडने हा चेंडू टिपत सिराजला झेलबाद केलं आणि भारत १७५ धावांवर सर्वबाद झाला.

Story img Loader