भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा डाव २४३ धावांवर आटोपला. ४३ धावाच्या आघाडीच्या जोरावर भारतासमोर २८७ धावांचे आव्हान ठेवले आहे. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा अडखळतीच झाली आहे. सलामीचा फलंदाज के. एल. राहुल चौथ्या चेंडूवर खातेही न उघडता बाद झाला. याआधी पहिल्या डावात राहुल अवघ्या २ धावा करुन तंबूत परतला होता. यामुळेच नेटकरी राहुलवर चांगलेच संतापले असून मागील ११ डावांपैकी ७ डावांमध्ये बोल्ड झालेल्या राहुलने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असा टोकाचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. राहुल बाद झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ट्विटवर KL Rahul हा टॉप ट्रेण्डींग टॉपिक होता. अनेकांनी राहुलची खिल्ली उडवत दुसऱ्या खेळाडूला त्याच्या जागी संधी द्यावी अशी मागणीही केली आहे. जाणून घेऊयात काय आहे नेटकऱ्यांचे राहुलच्या या खराब फॉर्मबद्दलचे म्हणणे…

नाव बदलून तरी फरक पडेल का

राहुलचा खेळ म्हणजे दिल देहला देनेवाला

सोप्प गणित

मागील १७ डावांमध्ये

धवनची रिअॅक्शन

पुढच्या समान्यामध्ये

परत कधीच क्रिकेट खेळू नकोस

राहुलवर बंदी घाला काही वर्ष

हनुमान चालीसा सुरु

मागील ११ पैकी ७ सामन्यात बोल्ड

हा चांगला समलामीचा फलंदाज आहे राहुलपेक्षा

तो करतोय झिरोचे प्रमोशन

अपेक्षा आणि सत्य

मैदानात येण्याआधीच

मी जास्त वेळ श्वास थांबवून ठेऊ शकतो

लगेच नेट प्रॅक्टीस नको

सत्कार

हे चालतील पण राहुल नको

स्कॅम

बेस्ट अॅक्टर इन क्रिकेट

दरम्यान चौथ्या दिवशीच पिचवर चेंडू उसळी घेत असल्याने २८७ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची दमछाक होणार आहे. मैदानात टिकून राहणे हेच मोठे आव्हान फलंदाजांसमोर असणार आहे.

Story img Loader