भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा डाव २४३ धावांवर आटोपला. ४३ धावाच्या आघाडीच्या जोरावर भारतासमोर २८७ धावांचे आव्हान ठेवले आहे. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा अडखळतीच झाली आहे. सलामीचा फलंदाज के. एल. राहुल चौथ्या चेंडूवर खातेही न उघडता बाद झाला. याआधी पहिल्या डावात राहुल अवघ्या २ धावा करुन तंबूत परतला होता. यामुळेच नेटकरी राहुलवर चांगलेच संतापले असून मागील ११ डावांपैकी ७ डावांमध्ये बोल्ड झालेल्या राहुलने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असा टोकाचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. राहुल बाद झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ट्विटवर KL Rahul हा टॉप ट्रेण्डींग टॉपिक होता. अनेकांनी राहुलची खिल्ली उडवत दुसऱ्या खेळाडूला त्याच्या जागी संधी द्यावी अशी मागणीही केली आहे. जाणून घेऊयात काय आहे नेटकऱ्यांचे राहुलच्या या खराब फॉर्मबद्दलचे म्हणणे…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा