Umesh Yadav 100 test wickets on Indian soil: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने इंदोर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या खात्यात एक अतिशय खास कामगिरी जमा केली आहे. उमेश यादवने मिचेल स्टार्कला क्लीन बोल्ड करून भारतातील १०० कसोटी गडी बाद केले. उमेश यादव भारतातर्फे १०० कसोटी बाद करणारा १३वा भारतीय गोलंदाज ठरला. यादवने भारतात ३१ कसोटीत १०० बाद घेतले. तसे, घरच्या भूमीवर १०० कसोटी गडी बाद करणारा तो भारताचा पाचवा वेगवान गोलंदाज ठरला. उमेशच्या आधी कपिल देव, जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि इशांत शर्मा हे पराक्रम करू शकले आहेत. यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत ५० बळीही पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो ११वा भारतीय गोलंदाज ठरला.

वडिलांच्या निधनानंतर स्वतः ला सावरत शानदार कामगिरी

उमेश यादव यांचे वडील तिलक यादव यांचे नुकतेच निधन झाले. दिवंगत तिलक यादव हे कोळसा खाणीत काम करायचे. दरम्यान त्याने उमेशला क्रिकेटपटू बनण्याची परवानगी दिली. वडिलांच्या निधनामुळे दु:खी झालेल्या उमेश यादवने भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले. इंदोर कसोटीच्या दुस-या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळलेल्या उमेश यादवने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची पळताभुई थोडी केली.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

उमेश यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदोर कसोटीच्या पहिल्या डावात ५ षटके टाकली आणि एका निर्धाव षटकासह ३/११ घेतले. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने प्रथम कॅमेरॉन ग्रीन (२१) ला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर त्याने मिचेल स्टार्कला (१) क्लीन बोल्ड केले. उमेशचा हा भारतातील १००वा कसोटी बळी ठरला. यानंतर यादवने टॉड मर्फीला क्लीन बॉलिंग देत आपला १०१वा बळी पूर्ण केला. मर्फीला खातेही उघडता आले नाही.

होळकर स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करत आहे, अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज येथे गोलंदाजी करताना क्वचितच दिसले. मात्र, कर्णधार रोहित शर्माने लाल चेंडू उमेश यादवकडे सोपवला तेव्हा काही वेगळेच घडले. वास्तविक उमेशने आपल्या वेगानं इंदोरमध्ये दहशत निर्माण केली आहे. होय, उमेशने फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर वेगवान मारा केला आहे.

उमेश यादवचा मिशेल स्टार्कला क्लीन बॉलिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक ही घटना घडली तेव्हा क्रिकेट चाहत्यांना वेगवान गोलंदाजाची खरी ताकद पाहायला मिळाली. उमेशने मिचेल स्टार्कला राऊंड द विकेट आउट केले आणि या वेळी चेंडू स्टंपला लागला तेव्हा स्टंप एक-दोनदा नाही तर सुमारे ७-८ वेळा फिरला आणि यष्टिरक्षकाच्या जवळ पोहोचला. विशेष म्हणजे कपिल देवने घरच्या परिस्थितीत वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २१९ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: उमेश-अश्विनचा कहर! ११ धावांत ६ विकेट्स अन् कांगारूंचा खेळ खल्लास, ऑस्ट्रेलियाकडे केवळ ८८ धावांची आघाडी

उमेशने विराटच्या षटकारांची केली बरोबरी

दरम्यान, उमेश यादवने या षटकारानंतर एका खास विक्रमात विराटची बरोबरी केली. भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी षटकार मारणाऱ्यांमध्ये यादवने युवराज सिंग (२२) आणि रवी शास्त्री (२२) यांना मागे टाकले. यादीत सद्या विराट कहोली आणि यादव प्रत्येकी २४ षटकारांसह बरोबरीवर आहेत.

Story img Loader