IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. पहिल्या दोन सामन्याप्रमाणे तिसऱ्या कसोटीतही खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल होती, ज्यावर भारतीय फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे भारताने अवघ्या १०९ धावांवर सर्व विकेट्स गमावल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे कांगारूंसमोर सर्व भारतीय फलंदाज संथ आणि सांभाळून खेळत होते, तर दुसरीकडे संघाचा गोलंदाज उमेश यादवने खेळपट्टीवर येताच मोठे फटके मारण्यास सुरूवात केली. त्याने प्रथम नॅथन लायनला षटकार ठोकला तर नंतर टॉड मर्फीला षटकार ठोकून गुडघे टेकून डीप मिडविकेटला षटकार खेचला. त्यानंतरही त्याचे फटके मारणे सुरूच होते. यावर किंग कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी होती.

उमेश यादवने गुडघे टेकून गगनचुंबी षटकार ठोकला

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज उमेश यादव आपल्या चेंडूने कांगारूंना त्रास देत शानदार फटकेबाजी केली. निव्वळ फटकेबाजी नाही तर त्याने या सामन्यात फलंदाजीची कलाही दाखवली. ३१व्या षटकात येताच खेळपट्टीवर येताच उमेश यादवने शॉट मारायला सुरुवात केली. षटकाच्या दुसऱ्याचं चेंडूवर त्याने आपल्या शॉटने गोलंदाजाला चकित केले. असाचं शॉट त्याने टॉड मर्फीच्या षटकात दुसऱ्या गुड लेंथ चेंडूवर गुडघे टेकून उत्कृष्ट षटकार मारला. हे पाहून विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला मात्र प्रशिक्षक द्रविड यांना फारसे आवडले नाही पण मैदानातील उपस्थित प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारला.

पुजाराचा नकोसा विक्रम

पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत १२ वेळा नेथन लायनच्या फिरकीचा शिकार बनला आहे. यापूर्वी तो इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने त्याला डझनभर वेळा शिकार बनवले होते. पुजाराव्यतिरिक्त या यादीत भारताचे महान दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्याही नावाचा समावेश आहे. त्याने कसोटीत १२ वेळा इंग्लंडच्या डेरेक अंडरवूड गोलंदाजाविरुद्ध १२ वेळा विकेट गमावली होती.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: मॅथ्यू कुहनेमनचे पंचक! कांगारूंच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची शरणागती, १०९ धावांत पहिला डाव आटोपला

भारतीय संघाच्या डावातील ९वे षटक सुरू होते. हे षटक ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नेथन लायन टाकत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवेळी स्ट्राईकवर चेतेश्वर पुजारा होता. लायनने चेंडू फेकताच पुजाराही गोंधळात पडला. त्याने आधी पाय बाहेर काढला, पण परत एक पाऊल मागे जाऊन चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप वेळ झाला होता. चेंडूला उसळी भेटली नव्हती. अशात चेंडू बॅट आणि पॅडला सोडून मधल्या स्टंपवर जाऊन लागला. त्यामुळे पुजाराला यावेळी केवळ एक धाव काढून तंबूत परतावे लागले. यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus umesh yadav kneeling down and rooting for a sky high six virat kohli was also surprised watch video avw