Virat Kohli Sam Konstas Fight IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर फलंदाज सॅम कोन्स्टास यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यावेळी सॅम कोन्स्टासबरोबर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा मैदानात होता. जो नंतर कोहली आणि कोन्स्टास यांच्यामध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याने ही घडलेली घटना सर्वात जवळून पाहिली. उस्मान ख्वाजाने पहिल्या दिवसाच्या सामन्यानंतर सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोहली आणि कॉन्स्टासची एकमेकांना टक्कर झाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि दोघांना शांत करण्यासाठी ख्वाजा सर्वात आधी तिथे पोहोचला. ख्वाजाने दोन्ही खेळाडूंना शांत करण्याचे काम केले. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर उस्मान ख्वाजाने या वादाबाबत सांगितलं आणि संपूर्ण वादात आपली भूमिकाही उघड केली.

हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघ मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे नेमकं कारण

ख्वाजाने एबीसी स्पोर्ट्सशी संवाद साधला आणि सॅम आणि कोहली यांच्यात जे काही घडलं ते सांगितलं. ख्वाजाने सांगितलं की, सुरुवातीला त्याने काही पाहिलं नाही, कारण तो फिल्ड बदलत होता, परंतु जेव्हा तो मागे फिरला तेव्हा त्याला दोघांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याचे दिसले. ख्वाजा म्हणाला की, “त्यावेळी मला काय झालं ते दिसले नाही कारण मी दुसऱ्या बाजूला जात होतो, पण जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा मी म्हणालो, अरे हे काय झालंय? मी कोहली आणि सॅममध्ये काही बोलणं सुरू असल्याचं पाहिले जे साधारण बोलणं नव्हतं. मला आश्चर्य वाटलं की नेमकं काय घडत आहे. कॉन्स्टासला पाहिलं तर तोही फार संतापलेला दिसला. मी मध्ये जाऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा – Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

पुढे ख्वाजा म्हणाला, “सॅम, बुमराह आणि कोहली यांच्यात पूर्ण वेळ काही ना काही बोलणं सुरू होतं, पण याचं रूपांतर अजून काही मोठ्या वादावादीमध्ये होऊ नये म्हणून मी आधी आलो नाही. कोहलीबाबत बोलताना ख्वाजा म्हणाला, मी कोहलीला खूप काळापासून ओळखतो. तो अकादमीत आला तेव्हापासून आणि मी अंडर-19 क्रिकेट खेळायचो आणि तेव्हा विराट कोहली अकादमीमध्ये आला होता. आम्ही खूप पूर्वीपासून मित्र आहोत. म्हणून मी सॅमला शांत राहण्यास सांगितलं आणि म्हटलं मी विराटशी बोलेन आणि मी हे प्रकरण मिटवतो.”

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO

यानंतर कोहली आणि ख्वाजा यांच्यात घडलेल्या प्रकाराबाबत काय बोलणं झालं, हे विचारताच त्याने सांगण्यास नकार दिला. ख्वाजा म्हणाला की, “असंच काहीसं बोलणं झालं. तुम्हालाही सर्व काही माहित नाहीय. मैदानावर जे घडतं ते मैदानावरच राहतं.”

मैदानावरील या प्रकरणानंतर ICC ने विराट कोहलीवर मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावला आहे. तसेच फक्त एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. २०१९ नंतर प्रथमच कोहलीला आयसीसीकडून शिक्षा झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus usman khawaja reveals how he stop virat kohli sam konstas fight on field melbourne test bdg