India vs Australia World Cup Final 2023: भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. कोहलीने रविवारी (१९ नोव्हेंबर) विश्वचषक फायनलमध्ये ५० हून अधिक धावा करून एक विशेष कामगिरी केली. त्याने या आवृत्तीतील सलग पाचव्या डावात ही कामगिरी केली आहे. विश्वचषकात त्याने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये विराटने सलग पाच डावांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय फक्त स्टीव्ह स्मिथलाच ही कामगिरी करता आली आहे. स्मिथने २०१५ मध्ये ही कामगिरी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोहलीने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ११७ धावा केल्या होत्या. विश्वचषकाच्या एका आवृत्तीत उपांत्य आणि अंतिम सामन्यात ५० हून अधिक धावा करणारा तो सातवा फलंदाज आहे. या प्रकरणात तो पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियांदादच्या क्लबमध्ये सामील झाला. मियांदादने १९९२च्या विश्वचषकात अशी कामगिरी केली होती.

अरविंद डी सिल्वा आणि स्मिथच्या क्लबमध्ये विराट

एकाच आवृत्तीच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा विश्वचषक इतिहासातील पहिला खेळाडू इंग्लंडचा माईक ब्रेअरली होता. त्यांनी हे १९८७ मध्ये केले होते. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड बूनने १९८७ मध्ये, मियांदादने १९९२ मध्ये, श्रीलंकेच्या अरविंदा डी सिल्वाने १९९६ मध्ये, न्यूझीलंडच्या ग्रँट इलियटने आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने २०१५ मध्ये ही कामगिरी केली होती.

विश्वचषकात कोहलीची चमकदार कामगिरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये कोहलीने ५४ धावांची इनिंग खेळली होती. त्याने ६३ चेंडूंचा सामना करत चार चौकार मारले. कोहलीने या विश्वचषकात ११ सामन्यात एकूण ७६५ धावा केल्या. त्याने ९५.६२च्या सरासरीने आणि ९०.३२च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. विराटने या विश्वचषकात एकूण तीन शतके झळकावली. त्याने सहा अर्धशतकेही झळकावली.

हेही वाचा: IND vs AUS Final: लागोपाठ दोन शतके झळकावणारा श्रेयस अंतिम फेरीत ठरला फ्लॉप; शुबमन गिलनेही विकेट फेकली

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची खराब फलंदाजी

विराट कोहली, के.एल. राहुल आणि रोहित शर्मा वगळता एकाही फलंदाजाला ३० चा आकडा पार करता आला नाही. विराट आणि के.एल. राहुल यांनी आपापली अर्धशतके झळकावली. रोहितने ४७ धावांची खेळी केली, तो खराब फटका मारून बाद झाला. विराट बाद होताच भारताच्या एकापाठोपाठ एक विकेट्स पडत गेल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयाचीसाठी केवळ २४१ धावांचे माफक लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाचे गोलंदाज हा सामना जिंकवून देण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.