IND vs AUS : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला. त्या डावात कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची खेळी केली. त्या या शतकामुळे त्याने एक मोठा पराक्रम केला. महत्वाचे म्हणजे त्याच्या या पराक्रमामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या विक्रमाला धोका निर्माण झाला आहे.

विराट कोहलीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कर्णधारपद भूषविण्यास सुरुवात केले होते. २०१८ साली त्याने ऑस्ट्रेलियातच कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. कसोटीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद २५ शतकांचा पल्ला गाठण्याचा विक्रम त्याने केलाच. याबरोबरच कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याने दुसरे स्थान पटकावले आहे.

 

कोहलीने कर्णधार म्हणून ३४ वे शतक झळकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ४१ शतकांसह आघाडीवर आहे. मात्र, यासाठी त्याने ३७६ डाव खेळले, परंतु कोहलीने १४५ डावांमध्ये ३४ शतके केली आहेत.

कोहलीचे सामान्यतील आणखी काही पराक्रम –

  • कोहलीने २०१८ मधील पाचवे कसोटी आणि सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधील ११वे शतक झळकावले.
  • कोहलीचे हे ऑस्ट्रेलियातील सहावे कसोटी शतक ठरले. तेंडुलकरनेही ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध सहा कसोटी शतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याने सचिनच्या कामगिरीही बरोबरी साधली आहे.
  • यासह १९९२ नंतर पर्थवर कसोटी शतक झळकावणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला. १९९२ मध्ये तेंडुलकरने अशी कामगिरी केली होती.
  • एका वर्षात परदेशात सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत विराटने दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ अव्वल आहे. त्याने २००८ या वर्षात ११ सामन्यात १२१२ धावा केल्या होत्या. विराटने २०१८ मध्ये १० सामन्यात १०२९ धावा केल्या आहेत.

Story img Loader