Virat Kohli catch Steve Smith upset on Umpire after give not out video viral in IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील शेवटचा सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फलंदाजीत टीम इंडियाची सुरुवात काही खास राहिली नाही. कारण दोन्ही सलामीवीर अवघ्या १७ धावांवर बाद झाले. यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला पण पहिल्याच चेंडूवर चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला, ज्यानंतर तो झेलबाद होण्यापासून थोडक्यात वाचला.

कारण जेव्हा स्टीव्हन स्मिथने चेंडू पकडला, तेव्हा त्याचा हात चेंडूखाली होता. विराट कोहलीचा हा झेल स्मिथने जवळपास पकडला होता. तोपर्यंत विराट कोहलीने आपले खातेही उघडले नव्हते. विराटचा हा झेल घेताच ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये आनंदाची लाट उसळली होती. मात्र, मैदानावरील अंपायरला तो झेल पूर्णपणे घेतला आहे की नाही माहित नव्हते, त्यामुळे त्यांनी हे जाणून घेण्यासाठी टीव्ही अंपायरकडे पाठवला.

fire incidents in Mumbai Andheri Goregaon Matunga
Mumbai Fire News: अंधेरी येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग; मुंबईत घडल्या चार आगीच्या घटना
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Narendra Modi reaction on Donald Trump
Narendra Modi Reaction on Donald Trump Victory : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर ‘मित्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-अमेरिका…”
Jammu kashmir Article 370
Jammu kashmir Article 370 : जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर; भाजपा आमदारांचा सभागृहात गदारोळ
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

विराट कोहलीला मिळाले जीवनदान –

टीव्ही अंपायरने बारकाईने पाहिले असता, झेल पूर्ण होण्यापूर्वी चेंडू थोडासा जमिनीवर टेकला होता, पण स्टीव्हन स्मिथ हा निर्णय मानायला तयार नव्हता. सिडनी कसोटीत विराट कोहलीला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. ज्यामुळे तो नशीबवान ठरला. मात्र, अंपायरच्या या निर्णयामुळे स्मिथ नाराज दिसला. दरम्यान कोहलीबाबतच्या अंपायरच्या निर्णयाने भारतीय ड्रेसिंग रुमनेही सुटकेचा नि:श्वास सोडला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, त्यानंतर विराट कोहलीने सावध फलंदाजी करत आपले खाते उघडले आणि शुबमन गिलच्या साथीने टीम इंडियाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली.

हेही वाचा – Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय संघाचा कसोटीत कसा राहिलाय रेकॉर्ड? जाणून घ्या

कर्णधार रोहित शर्माने घेतली विश्रांती –

k

b

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत विराट कोहलीची कामगिरी काही खास राहिली नाही. पर्थ कसोटी सामन्यातील दुसरा डाव सोडला तर संपूर्ण मालिकेत विराट कोहली धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशा स्थितीत सिडनी कसोटी सामना विराटसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण इथे जर तो धावा करू शकला नाही तर त्याच्यासाठी कठीण होऊ शकते. कारण सिडनी कसोटीत कर्णधार रोहित शर्माने खराब फॉर्ममुळे स्वत: विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader