Virat Kohli and Gautam Gambhir Celebration After India Avoid Follow on: गाबा कसोटीत बुमराह आणि आकाशदीपच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर भारताने फॉलोऑन टाळला. आकाशदीपने फॉलोऑन टाळण्यासाठी ४ धावांची गरज असताना जबरदस्त चौकार लगावत फॉलोऑन टाळला आणि मैदानावर एकच जल्लोषाचं वातावरण तयार झालं. मोठ्या मेहनतीने उभारलेल्या या धावसंख्येला बुमराह-आकाशदीपच्या जोडीने कायम ठेवलं. फॉलोऑन टाळल्याचं पाहताच ड्रेसिंग रूममध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली टाळी देत आक्रमक सेलिब्रेशन केलं. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीब्रेकनंतर खेळ सुरू झाला तेव्हा पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाने मोहम्मद सिराजला बाद केले होते. त्यावेळी टीम इंडियाची धावसंख्या ८ बाद २०१ धावांवर होती. यानंतर मैदानावर सेट असलेला फलंदाज रवींद्र जडेजाही भारताची धावसंख्या २१३ धावांवर बाद झाला. जडेजाने महत्त्वपूर्ण ७७ धावांची खेळी केली आणि भारताच्या धावसंख्येत महत्त्वाची भूमिका बजावली. इथून पुढे बुमराह आणि आकाशदीपच्या जोडीने एकेक धाव घेत आणि बचावात्मक फलंदाजी करत टीम इंडियाला २४५ धावांच्या पुढे नेले.

हेही वाचा – IND vs AUS: भारताचा फॉलोऑन टळला! बुमराह-आकाशदीपच्या जोडीने जीवाची लावली बाजी, जडेजा-राहुलने रचला होता पाया

रवींद्र जडेजा बाद झाल्यावर फॉलोऑन वाचवण्यासाठी टीम इंडियाला ३३ धावांची गरज होती. तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि नॅथन लायनसारखे गोलंदाज भारताच्या या शेवटच्या जोडीला बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. पण टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंनी चांगल्या चेंडूंचा मान ठेवत संधी मिळेल तेव्हा चौकार-षटकार लगावले आणि आवश्यक ३३ धावा करून भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण तयार केलं.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा कसोटीतून निवृत्ती घेणार? गाबा कसोटीत बाद झाल्यानंतर दिले संकेत; Photo होतोय व्हायरल

अशारितीने दिवसाअखेर आकाशदीप ३१ चेंडूत २७ धावा करून तर जसप्रीत बुमराह १० धावांवर नाबाद परतले आहेत. दिवसाअखेर भारताने ९ बाद २५२ धावा केल्या होत्या आणि यासह ऑस्ट्रेलियाकडे अजूनही १९३ धावांच्या आघाडी आहे. यासह गाबा कसोटीचा उद्या अखेरचा दिवस आहे आणि गाबा कसोटी ड्रॉ होण्याची शक्यता अधिक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus virat kohli gautam gambhir aggressive celebration after india avoid follow after bumrah akashdeep heroic watch video bdg