Virat Kohli I am your father Australian newspaper crossed all limits : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन मीडियासाठी सुपरस्टार असलेला विराट कोहली चौथ्या सामन्यापर्यंत त्यांच्यासाठी खलनायक ठरला आहे. मेलबर्न कसोटीत पहिल्या दिवशी सॅम कॉन्स्टासशी झालेल्या धक्काबुकीनंतर एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, १९ वर्षीय सलामीवीराचे फोटो पोस्ट छापत ‘विराट, मी तुझा पिता आहे’ असे लिहिले आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राच्या या हेडलाईनने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून भारतीय चाहते त्याचा निषेध करत आहेत.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात सॅम कॉन्स्टासला पदार्पणाची संधी दिली, त्याच्या पहिल्याच डावात त्याने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची चांगलीच धुलाई केली. यानंतर विराट कोहली आणि त्यांच्यात धक्काबुकी झाली. ज्यामुळे आयसीसीने कोहलीवर दंड ठोठावला आणि त्यानंतर त्याने आपलीच चूक मान्य केली. यानंतरही ऑस्ट्रेलियन मीडिया मात्र विराट कोहलीला सातत्याने लक्ष्य करत आहे.

Why Did Nitish Reddy Keep His Helmet On Bat After Maiden International Century During IND vs AUS 4th Test
IND vs AUS : नितीश रेड्डीने शतकानंतर बॅटवर का अडकवले हेल्मेट? स्वत:च केला खुलासा, कारण जाणून कराल सलाम
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
IND vs AUS Michael Hussey reflects on Rohit Sharmas reaction to Labuschagnes dropped catch at MCG
IND vs AUS : ‘विकेटची नितांत गरज होती, पण…’, जैस्वालकडून झेल सुटल्यानंतर संतापलेल्या रोहितवर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची टीका
IND vs AUS What is the highest successful run chase in Melbourne Tests
IND vs AUS: मेलबर्नमध्ये धावांच्या यशस्वी पाठलाग करायचा विक्रम काय आहे? टीम इंडिया दडपणाखाली?
Nitish Reddy's Father Touches Feet of Sunil Gavaskar When He Meets with Family After Century Video Viral
IND vs AUS: नितीश रेड्डीच्या वडिलांनी सुनील गावसकरांच्या पायावर डोकं ठेवून केलं अभिवादन; भावुक करणारा VIDEO आला समोर
Rohit Sharma Statement on India Defeat Said They fought hard with last wicket partnership cost us the game
IND vs AUS: “…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राची विराट कोहलीबद्दल वादग्रस्त टिप्पणी –

या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन टॅब्लॉइड ‘संडे टाइम्स’ने दिलेल्या हेडलाईनने भारतीय चाहत्यांना हादरवून सोडले आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की ऑस्ट्रेलियन मीडियाने नवा नीचांक गाठला आहे. यानंतर संतापलेले भारतीय चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून आपला रोष व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने केला मोठा पराक्रम! सॅम कॉन्स्टासची विकेट घेत मोडला कपिल देवचा ३३ वर्षांपूर्वीचा विक्रम

वृत्त लिहिपर्यंत चौथ्या दिवशी लंच ब्रेकनंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ७ गडी गमावून १५० धावा केल्या आहेत. यजमानांकडे अजूनही २५५ धावांची आघाडी आहे. जसप्रीत बुमराह भारतासाठी पुन्हा एकदा तारणहार ठरला आहे. त्याने ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर मोहम्मद सिराजनेही ३ विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, नितीश रेड्डींच्या शतकाच्या जोरावर भारताने सामन्यात पुनरागमन केले, मात्र ऑस्ट्रेलियाच्या ४७४ धावांसमोर टीम इंडियाला केवळ ३६९ धावाच करता आल्या.

Story img Loader