IND vs AUS Virat Kohli shows empty Pockets to Aussie Fans : भारत विरुद्ध सिडनी येथे झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून जिंकला. यासह त्याने मालिका ३-१ अशी खिशात घातली आणि १० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. यासह डब्ल्यूटीसी फायनल २०२५ मध्ये धडक मारली. दरम्यान या सामन्याती विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलियन चाहत्यांना डिवचताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळाच्या सकाळच्या सत्रात ही घटना घडली. जेव्हा विराट कोहली भारताचे नेतृत्व करत होता, तेव्हा ऑस्ट्रेलियने चाहते त्याला चिडवत होते. यानंतर विराटने ऑस्ट्रेलियन चाहत्यांना रिकामे खिसे दाखवून डिवचले. विराट कोहलीचे ही कृती ऑस्ट्रेलियन चाहत्यांना सँडपेपर वादाची आठवण करु देणारी होती. या सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतीमळे बाहेर पडल्याने विराट भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होता. त्यावेळी त्याने कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टच्या सँडपेपर घोटाळ्याची नक्कल करुन ऑस्ट्रेलियन चाहत्यांना गप्प केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

२०१८ मध्ये झाला होता सँडपेपर वाद –

विराट कोहलीने आपला रिकामा खिसा ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना दाखवला. त्याने प्रेक्षकांकडे बोट दाखवून आपले रिकामे खिसे दाखवले. जणू ‘बघा, माझ्याकडे सँडपेपर नाही’ असे म्हणत होता. विराटच्या या कृतीने सँडपेपर वादाची आठवण करून दिली आहे. हा वाद २०१८ मध्ये झाला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांचा समावेश होता.

हेही वाचा – IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक

सँडपेपर वाद ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील एक काळा अध्याय –

विराट कोहलीने हा स्पष्टपणे सँडपेपरच्या वादाबद्द्ल काढलेला चिमटा होता. सँडपेपर वाद ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियन दर्शक संतापले असतील. त्याचबरोबर कोहलीची ही शैली भारतीय चाहत्यांना आवडत आहे. सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया १६२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ४ गडी गमावून सहज पूर्ण केले.