Video : भारताविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने अतिशय संथ फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय पहिल्या सत्रात त्यांच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. पण दुसऱ्या सत्रात त्यांनी ३ बळी गमावले. सलामीवीर फिंच (५०) आणि हॅरीस (७०) यांनी शतकी सलामी दिली. फिंच नंतर ख्वाजा बाद झाला. पण पीटर हॅंड्सकॉम्बचा झेल हा साऱ्यांचे लक्ष वाढणारा ठरला.
५५ व्या षटकात पीटर हॅंड्सकॉम्ब १४ चेंडूत ७ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी अनुभवी इशांत शर्माने उत्कुष्ट चेंडू टाकला. पीटर हॅंड्सकॉम्बने त्या चेंडूला बॅट लावली आणि चेंडू स्लिपमध्ये गेला. त्यावेळी कर्णधार विराट कोहली याने अत्यंत चपळाईने स्लिपमध्ये अफलातून झेल टिपला. चेंडू अत्यंत वेगात आणि उसळता होता. त्यामुळे चेंडू रोखणे आणि झेल टिपणे कठीण होते. पण कोहलीने तो थक्क करणारा झेल टिपला.
TAKE A BOW @IMVKOHLI
A piece of genius from #KingKohli in the slips https://t.co/EM9t1uPKGo #Kohli #ViratKohli pic.twitter.com/64WGLLKDKM
— Telegraph Sport (@telegraph_sport) December 14, 2018
दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. हीच विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर मायभूमीत भारताविरुद्ध प्रथमच सलामीचा कसोटी सामना गमावण्याची नामुष्की ओढवल्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत ‘कमबॅक’ करण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा मानस आहे.