Wasim Jaffer Meme Tweet on Cameron Green: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसऱ्या टी-२० सामन्यामध्येही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सलामीवीर कॅमरॉन ग्रीनने तुफान फटकेबाजी केली. कॅमेरॉन ग्रीनने केलेली सुरुवात पाहता ऑस्ट्रेलियन संघ भारताला २०० हून अधिक धावांचं लक्ष्य देईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र फिरकी गोलंदाजांनी भन्नाट गोलंदाजी करत सामन्यावर भारताला पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियन संघाला १८६ धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आलं. मात्र या सामन्यामध्येही ग्रीनने २१ चेंडूंमध्ये ५२ धावा कुटल्या. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर ग्रीनचा झेल के. एल. राहुलने पकडला. मात्र ग्रीनची फलंदाजी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने आगामी आयपीएलसंदर्भात एका मिमच्या आधारने भन्नाट भाकित केलं आहे.
नक्की पाहा >> Video: बॉल लागण्याआधीच कार्तिकच्या हाताने स्टॅम्प उडाला तरी मॅक्सवेल Runout देण्यात आलं; पाहा ‘तो’ नाट्यमय क्षण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा