Sunil Gavaskar on Pant: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर पळत आहे. नुकताच त्याचा भीषण अपघात झाला होता. ज्यात तो गंभीर जखमी झाला. अशा परिस्थितीत पंत पुन्हा कधी मैदानात उतरेल, हे कोणालाच माहीत नाही. त्याचवेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची रोमांचक बॉर्डर गावसकर ट्रॉफीही खेळली जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय चाहत्यांना ऋषभ पंतची उणीव भासत आहे. भारताने त्यांच्याच भूमीवर गेल्या दोन मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात पंतने मोलाचा वाटा उचलला होता. यामुळेच टीम इंडिया अडचणीत असताना चाहते पंतला मिस करू लागतात. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान या यष्टीरक्षक फलंदाजाची आठवण काढली.
गावसकर म्हणाले की, “ऋषभ जर तू ऐकत असेल तर आम्हाला तुझी आठवण येत आहे, लवकर बरे हो, असे गावस्कर यांनी समालोचन करताना सांगितले. मी तुम्हाला सांगतो, नवीन वर्षात ऋषभ पंत एका कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. शस्त्रक्रियेनंतर तो बरा होण्याच्या प्रक्रियेत आहे. तो क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार हे अद्याप कोणालाच माहीत नाही.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दिल्ली कसोटीत समालोचन करताना गावसकर म्हणाला, “ऑस्ट्रेलिया भाग्यवान आहे की ऋषभ पंतला नाही, “गावसकर म्हणाले. त्याला खूप काही सांगायचे असते, फलंदाजांसाठी नाही तर त्याच्या संघसहकाऱ्यांना नक्कीच. ऐक ऋषभ, आम्हाला तुझी आठवण येत आहे, लवकर बरा हो.”
या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडिया १-० ने आघाडीवर आहे. दिल्ली कसोटीबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात १ गडी गमावून ६१ धावा केल्या होत्या. कांगारूंचा संघ आता भारतापेक्षा ६२ धावांनी पुढे होता. मार्नस लाबुशेन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडसह खेळपट्टीवर उपस्थित होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया खूप मोठी आघाडी घेईल असे वाटत होते मात्र आर. अश्विन आणि जडेजा या जोडीने कांगारूंना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवायला सुरुवात केली की निम्मा संघ १०० धावांच्या आत तंबूत परतला आहे. सध्या ९५ वर ६ गडी बाद अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था झाली आहे.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या २६३ धावांसमोर भारताने पहिल्या डावात २६२ धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी अक्षर पटेलने ७४ धावांचे अर्धशतक झळकावले, तर माजी कर्णधार विराट कोहलीने वादग्रस्त पद्धतीने बाद होण्यापूर्वी शानदार ४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने या काळात सर्वाधिक ५ बळी घेतले. भारताला हा सामना जिंकायचा असेल, तर किमान ऑस्ट्रेलियाला २२०-२३० धावांच्या आत आवरावे लागेल. दिल्लीची खेळपट्टी चौथ्या डावात फिरकी गोलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरते, त्यामुळे येथे फलंदाजी करणे भारतासाठी सोपे जाणार नाही.