India vs Australia 1st ODI: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाला फक्त दोन आठवडे उरले आहेत. २०२३चा आशिया चषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आता विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची चाचपणी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका यजमान टीम इंडियासाठी सर्व संयोजन (टीम कॉम्बिनेशन) करून तयारीला अंतिम स्वरूप देण्याची शेवटची संधी असेल.

२२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये वरिष्ठ खेळाडू सहभागी होणार नाहीत. या सामन्यांमध्ये संघ श्रेयस अय्यरचा मधल्या फळीत समावेश होऊ शकतो. श्रेयसला आशिया चषकात सामने दुखापतीमुळे सामने खेळता आले नाहीत. अशा परिस्थितीत श्रेयसला विश्वचषकापूर्वी खेळण्याची संधी देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जगातील नंबर वन गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देताना प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी यांना आजमावले जाऊ शकते. उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली असून के.एल. राहुलकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Rohit Sharma to Play International Cricket Till Champions Trophy Unlikely play England Test Series According to Reports
Rohit Sharma: रोहित शर्मासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी अखेरची स्पर्धा? ‘या’ दिवशी अखेरचा सामना खेळण्याची शक्यता; मोठी अपडेट आली समोर
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

हेही वाचा: ICC WC Winners List: १९७५ ते २०१९ कसा होता विश्वचषक ट्रॉफीचा प्रवास? कोणत्या संघाने किती वेळा जिंकला वर्ल्डकप? जाणून घ्या

आशियाई खेळ की विश्वचषक, कोणाला मिळणार प्राधान्य?

एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला हा संघ विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघांचे मिश्रण आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कर्णधारपद भूषवणाऱ्या ऋतुराज गायकवाडने फारसे स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. त्याचबरोबर विश्वचषक संघात समाविष्ट असलेले शुबमन गिल आणि इशान किशन यांनाही एकत्र खेळण्याची संधी द्यावी लागणार आहे. भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंऐवजी ऋतुराजला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीला प्राधान्य दिल्यास तिलक वर्मा याला चौथ्या क्रमांकावर टीम इंडिया आजमावून पाहू शकते. पण दुखापतीतून परतलेल्या श्रेयस अय्यरला अद्याप फारशी संधी मिळालेली नाही, जो विश्वचषक संघाचा भाग आहे. या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून भारताला आपली तयारी मजबूत करायची आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड-टू-हेड आकडेवारी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १४६ वेळा सामना झाला आहे, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ८२ सामने जिंकले आहेत आणि भारताने ५४ सामने जिंकले आहेत, तर १० सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. भारतामध्ये या दोन संघांत झालेल्या ६७ एकदिवसीय सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने ३२ सामने जिंकले आहेत आणि भारताने ३० सामने जिंकले आहेत, तर ५ सामन्यांचा कोणताही निकाल लागू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत भारतात ११ एकदिवसीय मालिका खेळली आहे. या दोन संघांमधील पहिली द्विपक्षीय एकदिवसीय मालिका १९८४ मध्ये खेळली गेली आणि शेवटची एकदिवसीय मालिका २०२३च्या सुरुवातीला खेळली गेली. २०२० पासून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका जिंकलेली नाही. विशेष बाब म्हणजे या दोन संघांमधील मागील चार एकदिवसीय मालिकेपैकी भारताने तीन मालिका गमावल्या आहेत.

हेही वाचा: Harbhajan Singh: “कदाचित चहलचे संघातील कोणाशी भांडण…’, हरभजनचे धक्कादायक विधान, अश्विनबाबतही केला खुलासा

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग-११

इशान किशन, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक, कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

Story img Loader