IND vs AUS 4th Test Day 4 Highlights in Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाची शानदार गोलंदाजी चौथ्या दिवशी पाहायला मिळाली, पण तरीही ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी ९ बाद २२८ धावा केल्या आहेत, यासह त्यांनी ३३३ धावांची आघाडी मिळवली आहे. आता मेलबर्नच्या मैदानावर किती धावांचं लक्ष्य गाठणं शक्य आहे, रेकॉर्ड काय सांगतो ते जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाकडे १०५ धावांची आघाडी शिल्लक राहिली होती. भारताने चौथ्या दिवशी चांगली गोलंदाजी केली पण ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या जोडीने ५० धावांची भागीदारी रचत भारताला धक्का दिला आहे. आता टीम इंडियाचे टेन्शन थोडं वाढताना दिसत आहे. मेलबर्नमध्ये कसोटी क्रिकेटचं सर्वात मोठं यशस्वीपणे इंग्लंडच्या संघाने गाठलं होतं.

Rishabh Pant Perfect Throw and Mitchell Starc Run Out Nitish Reddy Fielding Watch Video IND vs AUS
IND vs AUS: ऋषभ पंतचा परफेक्ट थ्रो अन् स्टार्क रनआऊट, नितीश रेड्डीच्या साथीने मिळवली जबरदस्त विकेट; पाहा VIDEO
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Shivsena shinde candidate list
Shivsena Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर; भाजपाच्या शायना एनसींनाही तिकीट, पाहा विधानसभेसाठीचे नवे शिलेदार
tasgaon vidhan sabha money with Diwali faral
सांगली: दिवाळी फराळासोबत पैशांचे वाटप; तासगावमध्ये १ लाख रुपये जप्त
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Sanju Samson's wife reacts to hundred vs Proteas: My forever favourite hero
Sanju Samson : ‘तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो…’, संजू सॅमसनच्या शतकी खेळीनंतर पत्नी चारुलताच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष
Aaron Finch Befitting Reply to Sunil Gavaskar on Statement About Rohit Sharma Misses 1st Test Said If Your wife is going to have a baby IND vs AUS
Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर
Twenty20 series India vs South Africa match sport news
भारताच्या युवा ताऱ्यांचा कस; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना आज

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास, दिग्गजांना मागे टाकत ठरला जगातील नंबर वन गोलंदाज

मेलबर्नच्या मैदानावरील कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठं लक्ष्य

मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १९२८ साली कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्याच्या शेवटच्या डावात इंग्लंडसमोर ३२२ धावांचे लक्ष्य होते. जे इंग्लंडने गाठले होते आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. कसोटी क्रिकेटमधील या मैदानावर हे आतापर्यंतचे सर्वात मोठे लक्ष्य होते. मेलबर्नमधील ३४ यशस्वी पाठलाग करत विजय मिळवणारे संघ इंग्लंड (८) आणि ऑस्ट्रेलिया (२१) आहेत. फेब्रुवारी १९५३ मध्ये दक्षिण आफ्रिकेने २९५ धावांचे आव्हान सहा गडी राखून जिंकले होते.

हेही वाचा – IND vs AUS: सिराजच्या विकेटवरून मोठा ड्रामा, कमिन्सने तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर घेतला रिव्ह्यू; मैदानावरील पंचांनी पाहा काय केलं?

१. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (३३२ धावांचे लक्ष्य) – इंग्लंड-विजेता (१९२८)
२. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२९८ धावांचे लक्ष्य) – इंग्लंड-विजेता (१८९५)
३. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२९७ धावांचे लक्ष्य) – दक्षिण आफ्रिका – विजेता (१९५३)
४. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२८७ धावांचे लक्ष्य) – ऑस्ट्रेलिया – विजेता (१९२९)
५. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२८२ धावांचे लक्ष्य) – इंग्लंड – विजेता (१९०८)

हेही वाचा – IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सोडले ३ साधे झेल, रोहित शर्माने मैदानातच संताप व्यक्त करत दिली अशी प्रतिक्रिया; पाहा VIDEO

आशिया खंडातील संघांबद्दल बोलायचं तर डिसेंबर २०२० मध्ये फक्त भारताने एकदाच हा पराक्रम केला होता, जेव्हा त्यांनी ७० धावांचे लक्ष्य ८ गडी राखून जिंकले होते. २१ व्या शतकात, भारत वगळता, केवळ दक्षिण आफ्रिकेने मेलबर्नच्या मैदानावर १८३ धावांचे आव्हान नऊ गडी राखून जिंकल्यानंतर यशस्वीपणे पार केले होते. पण २१व्या शतकात मेलबर्नच्या मैदानावर ३०० धावांपेक्षा जास्तचे लक्ष्य चौथ्या डावात कोणत्याच संघाने गाठलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

२१ व्या शतकात मेलबर्न कसोटीत सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग करणारे संघ

१. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२३१ धावांचे लक्ष्य), २०१३
२. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१८३ धावांचे लक्ष्य), २००८
३. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (१२७ धावांचे लक्ष्य), २००४
४. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (१०७ धावांचे लक्ष्य), २००२
५. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (९७ धावांचे लक्ष्य), २००३
६. ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (७० धावांचे लक्ष्य), २०२०
७. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१० धावांचे लक्ष्य), २००१

हेही वाचा – WTC Final Scenario: भारताने मेलबर्न कसोटी गमावली किंवा ड्रॉ झाली तर WTC फायनलचं समीकरण कसं असेल? वाचा सविस्तर

मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे आता ३३३ धावांची आघाडी आहे. उद्या ऑस्ट्रेलियाची अखेरची जोडी १०व्या विकेटसाठी मैदानात उतरणार आहे. मेलबर्नमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने फक्त एकदाच विजय मिळवला आहे. २०२० मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासमोर ७० धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने २ गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियाने हा सामना ८ विकेटने जिंकला होता.

Story img Loader